बॉलिवूड स्टार्स याठिकाणी करणार न्यू इअर सेलिब्रेशन!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 17:17 IST2017-12-23T11:47:49+5:302017-12-23T17:17:49+5:30
सध्या सगळीकडे ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमससाठी सर्वत्र तयारी ...

बॉलिवूड स्टार्स याठिकाणी करणार न्यू इअर सेलिब्रेशन!!
स ्या सगळीकडे ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमससाठी सर्वत्र तयारी केली जात असताना न्यू इअर सेलिब्रेशनचे प्लॅनिंगही केले जात आहे. बॉलिवूडमध्ये या दोन्ही दिवसांना प्रचंड महत्त्व दिले जात असून, दरवर्षी सेलेब्स ख्रिसमस अन् न्यू इयर सेलिब्रेशनसाठी काही खास प्लॅन करीत असतात. यंदा आपल्या बॉलिवूड स्टार्स त्यांचा न्यू इअर कसा अन् कुठे सेलिब्रेट करणार याचीच माहिती देणारा हा खास वृत्तांत...
![]()
आमिर खान : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान हा रिल लाइफबरोबरच रिअल लाइफमध्येही परफेक्ट असतो. सध्या सर्वच ख्रिसमस आणि न्यू इअरच्या सेलिब्रेशन मुडमध्ये असताना आमिर त्याच्या ‘ठग्स आॅफ हिंन्दोस्तान’ या त्याच्या मेगा प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. असे म्हटले जात आहे की, ख्रिसमस आणि न्यू इअरदरम्यान आमिर त्याच्या या चित्रपटाची शूटिंग थायलॅण्ड येथे करणार आहे. याचठिकाणी त्याने फॅमिलीसोबत न्यू इअर सेलिब्रेशन करण्याचे ठरविले आहे.
![]()
जॅकलीन फर्नांडिज : बॉलिवूडची बबली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिज तिच्या फॅमिलीसोबत बाली येथे जात आहे. याठिकाणी ती सर्वांसोबत टाइम स्पेंड करणार आहे. त्याचबरोबर ख्रिसमस सेलिब्रेट करणार आहे. जॅकलीन नुकतीच झी सिने अवॉर्ड्स २०१७ या इव्हेंटमध्ये बघावयास मिळाली होती.
![]()
राधिका आपटे : आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटात बघावयास मिळणारी अभिनेत्री राधिका आपटे सध्या बºयाचशा प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. उपलब्ध माहितीनुसार, राधिका यंदाचे ख्रिसमस आपल्या परिवारासमवेत पुणे सेलिब्रेट करणार आहे.
![]()
यामी गौतम : यामी या फेस्टिव्ह सीजनसाठी चंदीगढ येथे आपल्या परिवारासमवेत टाइम स्पेंड करणार आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून तिने या फेस्टिव्ह सीजनसाठी खास वेळ काढला आहे. ती आपल्या परिवारासमवेत ख्रिसमस सेलिब्रेट करणार आहे.
![]()
चित्रगंदा सिंग : चित्रंगदा सध्या तिच्या ‘एसबॅक-३’ आणि ‘बाजार’ या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. सूत्रानुसार, चित्रगंदा यंदा आपल्या परिवारासमेवत दिल्ली येथे टाइम स्पेंड करणार किंवा एका स्पेशल ट्रिपचा ती प्लॅन करणार आहे.
![]()
संजय दत्त : ख्रिसमस सेलिब्रेशन दरम्यान संजय दत्त आपल्या को-स्टार नर्गिस फाखरी हिच्यासोबत ‘तोरबाज’ची किर्गिस्तान येथे शूटिंग करणार आहे. ज्यानंतर दुबईमध्ये आपल्या परिवारासमेवत न्यू इअर सेलिब्रेशन करणार आहे.