केप टाऊनला अक्की-टिवंकल करणार न्यू ईअरचे सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 19:05 IST2016-12-21T19:05:40+5:302016-12-21T19:05:40+5:30

नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी आता प्रत्येकच जण करत आहेत. कुणी आऊटिंगला जाण्याचं प्लॅनिंग करत आहेत तर कुणी न्यू ...

New Year Celebration in Akki-Twinkle to Cape Town! | केप टाऊनला अक्की-टिवंकल करणार न्यू ईअरचे सेलिब्रेशन!

केप टाऊनला अक्की-टिवंकल करणार न्यू ईअरचे सेलिब्रेशन!

ीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी आता प्रत्येकच जण करत आहेत. कुणी आऊटिंगला जाण्याचं प्लॅनिंग करत आहेत तर कुणी न्यू ईअर पार्टीचे प्लॅन्स बनवत आहेत. ‘बी टाऊन’ चे सेलिब्रिटी देखील नववर्षाला वेलकम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ज्युनियर बच्चन अभिषेक आणि ऐश्वर्या रॉय बच्चन हे आराध्यासह अमेरिकेला त्यांचे ‘न्यू ईअर सेलिब्रेशन’ करणार आहेत.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि टिवंकल खन्ना हे हॉट कपलही त्यांचे न्यू ईअर सेलिब्रेशन साऊथ आफ्रिकेतील केप टाऊन येथे  करणार आहेत. २९ डिसेंबरला टिवंकलचा बर्थडे असून याचे डबल सेलिब्रेशन ते केपटाऊनला करतील. मित्र-परिवारासोबत ते ‘सी-फेसिंग’ भागात नववर्षाचे आगमन करणार आहेत. 

अक्षयकुमार आणि टिवंकल या दोघांनाही पर्यटन करण्याची आणि खाद्यपदार्थांची चव चाखण्याची आवड आहेच. त्यामुळे तिथे स्पेशल डिशेस आणि पार्टी असणार हे निश्चितच आहे. याअगोदर अक्की त्याच्या फॅमिलीसह कोस्टल सिटी येथे त्याच्या दिवाळी सुट्टया घालवण्यासाठी गेला होता. 

Web Title: New Year Celebration in Akki-Twinkle to Cape Town!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.