​‘दंगल’चा नवा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 20:28 IST2016-10-25T20:28:09+5:302016-10-25T20:28:09+5:30

एका दिवसांत सर्वाधिक वेळा पाहण्यात आलेले ट्रेलर ठरले आहे.

New record of 'riots' | ​‘दंगल’चा नवा विक्रम

​‘दंगल’चा नवा विक्रम

ong>आमिर खानच्या आगामी ‘दंगल’ या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच नवा इतिहास रचला आहे. एका दिवसांत सर्वाधिक वेळा पाहण्यात आलेले ट्रेलर ठरले आहे. केवळ 6 दिवसांत या ट्रेलरला यू-ट्युबर 21 कोटी वेळा पाहण्यात आले आहे. 

हरयाणाचे पहेलवान महावीर सिंग फ ोगट यांच्या जीवनावर ‘दंगल’ हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात आमिर खान महावीर सिंग यांची भूमिका साकारत आहे. आमिर साकारत असलेल्या भूमिकेतील नायकाला मुलगा व्हावा अशी इच्छा आहे. तो आपल्या देशासाठी स्वर्णपदक मिळवेल असे त्याला वाटते. मात्र त्याच्या घरी चार मुलींचा जन्म होतो. हताश झालेला नायक आपल्या मुलींना स्वत: प्रशिक्षित करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहेलवान बनवितो. या भूमिकेला आमिरने योग्य न्याय दिला असल्याचे ट्रेलरमधून तरी दिसते. 



या चित्रपटासाठी आमीरने चांगलीच मेहनत घेतली आहे. हरयाणवी बोलीभाषा आत्मसाद करून आपण परफेक्टनिस्ट आहोत याची ओळख त्याने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्याच्या मुली गीता व बबिता या भूमिका साकारणारी सना शेख व सान्या मल्होत्रा या देखील आपल्या भूमिकेत शोभल्या आहेत. यू-ट्युबवर सध्या ‘दंगल’ची ट्रेन्ड करीत असून ट्विटरवर धूम सुरू आहे. सर्वांत कमी दिवसांत सर्र्वाधिक पाहिला जाणारा ट्रेलर म्हणून ‘दंगल’चा उल्लेख केला जात आहे. 

या ट्रेलरचे डायलॉग देखील चांगलेच ट्रेन्ड होत आहेत. ‘म्हारी लडकीया छोरो रे कम हे के’ या टॅगलाईनला फोलो केले जात आहे. केवळ एक चित्रपट म्हणून नव्हे तर महिला सबलीकरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणूनही ‘दंगल’लवकरच नाव कमवेल यात शंकाच नाही.


 

Web Title: New record of 'riots'