​श्रद्धा-आदित्यच्या ‘ओके जानू’चे नवे पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 20:29 IST2016-12-28T20:29:07+5:302016-12-28T20:29:07+5:30

बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर व श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘ओके जानू’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू ...

New poster release of Shraddha-Aditya's 'OK Jaanu' | ​श्रद्धा-आदित्यच्या ‘ओके जानू’चे नवे पोस्टर रिलीज

​श्रद्धा-आदित्यच्या ‘ओके जानू’चे नवे पोस्टर रिलीज

ong>बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर व श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘ओके जानू’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर व गाणी रिलीज करण्यात आली असून त्याना चाहत्यांकडून चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. आता ‘ओके जानू’चे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये दोघांनी हॉट केमेस्ट्री लक्ष वेधणारी आहे. 

‘आशिकी २’ या चित्रपटात झळलेली आदित्य व श्रद्धाची जोडी आगामी ओके जानू या चित्रपटात पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर आधारीत असलेल्या या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता लागली आहे. या सिनेमाचे नवीन पोस्टर नुकतेच रिलिज झाले असून हे पोस्टर पहिल्या पोस्टरपेक्षा जास्त हॉट आहे. 

करण जोहर यांने आपल्या ट्विटर अकऊंटवरून हे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये श्रद्धा व आदित्य रॉय कपूर पार्टीमूडमध्य दिसत आहेत. पोस्टर रिलीज केल्यानंतर करणचे हे ट्विट चांगले व्हायरल झाले. 

आदित्य आणि श्रद्धाची केमिस्ट्री, लक्षवेधक ‘सिंगल लाईनर’ डॉयलग, आजच्या तरुणाईचे भावविश्व टिपण्याचा प्रयत्न, सुमधुर गिते यामुळे हा चित्रपट आतापासूनच हवा निर्माण करत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शाद अली यांनी केले असून दिग्दर्शक मनीरत्म यांचा गाजलेला तमीळ सिनेमा ‘ओके कानमानी’ या चित्रपटाचा हिंदी रिमेके ‘ओके जानू’ या नावाने करण्यात आला आहे. या चित्रपटात नसीरुद्दिन शाह यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाची गाणी गुलझार यांनी लिहली असल्याने ती कर्णप्रीय ठरली आहेत. हा चित्रपट १७ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. 

In LOVE there is abandon!! #OkJaanu#figureoutkarlenge#13thJanuarypic.twitter.com/zQB8HM8oQN— Karan Johar (@karanjohar) December 28, 2016 ">http://

}}}}

Web Title: New poster release of Shraddha-Aditya's 'OK Jaanu'