New Poster Out : ‘ए जेंटलमॅन’मधील सिद्धार्थ मल्होत्रा अन् जॅकलीन फर्नांडिस पहा हॉट अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 14:37 IST2017-07-08T09:03:09+5:302017-07-08T14:37:01+5:30
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या आगामी ‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटाचे नवे आणि हॉट पोस्टर रिलीज करण्यात आले ...
.jpg)
New Poster Out : ‘ए जेंटलमॅन’मधील सिद्धार्थ मल्होत्रा अन् जॅकलीन फर्नांडिस पहा हॉट अंदाज!
अ िनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या आगामी ‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटाचे नवे आणि हॉट पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. काही तासांपूर्वीच रिलीज करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये सिद्धार्थ आणि जॅकलीन खूपच हॉट अंदाजात दिसत आहेत, तर दुसºया एका पोस्टरमध्ये सिद्धार्थ निळ्या रंगाचे शर्ट आणि क्रीम रंगाच्या पॅण्टमध्ये दिसत आहे. त्याच्या कपड्यांचे वर्णन करण्याचे कारण की, तो चित्रपटात खूपच साध्या भोळ्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय या पोस्टरवरून ते स्पष्टही होते.
‘जेंटलमॅन’सारखा दिसणारा हा फोटो शेअर करताना सिद्धार्थने लिहिले की, ‘मला माहीत आहे की, सभ्य लोक हुबेहुब तुमच्यासारखे असतात. '@jacquelinef143 अगदी माझ्यासारखा- गौरव #AGentleman' तर बोल्ड पोस्टरविषयी सांगायचे झाल्यास यामध्ये सिध आणि जॅकलीनचा अंदाज बघण्यासारखा आहे. दोघांमधील हॉट केमिस्ट्री जुळून आल्याचे लगेचच समजून येते. पोस्टरमध्ये सिध आणि जॅकलीन कारमध्ये बसून स्मूच किस करीत आहेत. निळ्या रंगाचे शर्ट आणि क्रिम रंगाच्या पॅण्टमध्ये दिसणाºया सभ्य सिद्धार्थ अशा अवतारात दिसेल याचा कोणी अंदाजही बांधला नसेल. पण काहीही असो, चित्रपटात जॅकलीन आणि सिधची केमिस्ट्री प्रेक्षकांना वेड लावेल यात शंका नाही.
घर, नौकरी आणि प्रेम असेच काहीसे सिद्धार्थच्या आयुष्यात दाखविले जाण्याची शक्यता आहे. परंतु त्याच्या या स्वप्नवत आयुष्यात अशी एखादी घटना घडते ज्यामुळे त्याला बंदुक उचलावी लागते. या अगोदर चित्रपटाचे नाव ‘रिलोडेड’ असे ठेवण्यात आले होते. मात्र आता ते नाव बदलण्यात आले असून, ‘ए जेंटलमॅन’ असे ठेवले आहे. चित्रपटाला अॅक्शन आणि कॉमेडीचा तडका लावण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज निधिमोरू आणि डीके यांनी केले असून, हा चित्रपट २५ आॅगस्ट रोजी होणार आहे.

}}}} ">I know a sundar, susheel man is totally your type! @Asli_Jacqueline, just like me-Gaurav ! #AGentlemanSundarSusheelRiskpic.twitter.com/qQ4fuUir6Q— Sidharth Malhotra (@S1dharthM) July 6, 2017असो, एक गोष्ट तर स्पष्ट झाली की, चित्रपटात सिद्धार्थचे नाव गौरव आहे, तर जॅकलीनचे नाव ‘काया’ आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे दोन पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. पहिल्या पोस्टरमध्ये सिद्धार्थ जॅकलीनला गुंडांपासून वाचविताना दिसत आहे. त्याच्या हातात बंदूकही दिसत आहे. तर दुसºया पोस्टरमध्ये सिद्धार्थच्या एका हातात कूकर, तर दुसºया हातात बंदुक दिसत आहे. आतापर्यंत रिलीज झालेल्या चारही पोस्टरवरून चित्रपटाच्या कथेचा अंदाज बांधणे शक्य होत असून, चित्रपटात सिद्धार्थ एक प्रामाणिक आणि स्वप्नात रमणारा तरुण असेल हे नक्की.
I know a sundar, susheel man is totally your type! @Asli_Jacqueline, just like me-Gaurav ! #AGentlemanSundarSusheelRiskpic.twitter.com/qQ4fuUir6Q— Sidharth Malhotra (@S1dharthM) July 6, 2017