दीपिका पादुकोणने शेअर केला नवा फोटो; चाहत्यांनी म्हटले, ‘नाकाला काय झाले?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 19:40 IST2018-02-01T14:10:23+5:302018-02-01T19:40:30+5:30

अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर केला, मात्र चाहत्यांनी त्यास विचित्र स्वरूपाच्या कॉमेण्ट दिल्या.

New photo shared by Deepika Padukone; The fans said, 'What happened to the naka?' | दीपिका पादुकोणने शेअर केला नवा फोटो; चाहत्यांनी म्हटले, ‘नाकाला काय झाले?’

दीपिका पादुकोणने शेअर केला नवा फोटो; चाहत्यांनी म्हटले, ‘नाकाला काय झाले?’

िनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या ‘पद्मावत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती राणी पद्मावतीच्या अतिशय दमदार भूमिकेत बघावयास मिळत आहे. चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षक केवळ दीपिकाच्या अभिनयाचीच नव्हे तर तिच्या सौंदर्याचीही प्रशंसा करीत आहेत. मात्र याचदरम्यान दीपिकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने तिचे चाहते बुचकळ्यात पडले आहेत. होय, फोटोमध्ये दीपिकाच्या नाकाचा शेप काहीसा बदलेला दिसत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये दीपिकाचे चाहते तिच्या नाकाच्या शेपवर विचित्र स्वरूपाच्या कॉमेण्ट करीत आहेत. 

विशेष म्हणजे हा फोटो स्वत: दीपिकानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केल्याने तिच्या चाहत्यांमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे. दीपिकाचा हा फोटो फेमिना या प्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हर पेजवर दिसत आहे. दीपिकाला हा एकप्रकारचा बहुमानच असून, त्याचा आनंद आपल्या चाहत्यांसोबत सेलिब्रेट करण्यासाठी तिने हा फोटो शेअर केला आहे. मात्र त्यामध्ये तिच्या नाकाचा शेप बदलला असल्याने फोटोला विचित्र कॉमेण्ट मिळत आहेत. 
 

फोटोमध्ये दीपिका ब्लॅक बिकिनी टॉप आणि एक गोल्डन जॅकेट परिधान करून दिसत आहे. नेहमीप्रमाणे या फोटोमध्येही दीपिका सुंदर दिसत आहे. परंतु फोटोमध्ये ती काहीशी बदलेली दिसत आहे. वास्तविक एडीटिंगच्या माध्यमातून हा बदल केला असावा. परंतु त्यामुळे तिचे चाहते संभ्रमान पडले असून, त्यास विचित्र स्वरूपाच्या कॉमेण्ट देत आहेत. एका चाहत्याने म्हटले की, ‘तू गॉर्जियस आहेस, परंतु मॅगझिनने तुझ्या नाकावर काय केले? कमआॅन फेमिना ही सौंदर्याची विभत्सना आहे.’ तर काही चाहत्यांनी म्हटले की, ‘फोटोमध्ये काहीतरी गडबड आहे. कारण फोटोमधील दीपिका तुझ्यासारखी दिसत नाही. तुझे नाक खूप सुंदर आहे.’ काही दिवसांपूर्वी करिना कपूरच्या फोटोंवरूनही चाहत्यांनी अशाच स्वरूपाच्या कॉमेण्ट दिल्या होत्या. 

Web Title: New photo shared by Deepika Padukone; The fans said, 'What happened to the naka?'