नेहा धूपियाच्या साडीतील फोटोला नेटिझन्सने म्हटले ‘झेब्रा क्रॉसिंग’, पहा फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 17:25 IST2017-09-06T11:54:53+5:302017-09-06T17:25:40+5:30

तीन तासांपूर्वी शेअर केलेल्या नेहाच्या या फोटोला तेरा हजारांपेक्षा अधिक लाइक्स मिळाल्या. त्याचबरोबर फोटोला दिलेल्या कॉमेण्ट्स हास्यास्पद आहेत. वाचा सविस्तर !

Netizens said in a photo of Neha Dhupia sari, "Zebra crossing", see photo! | नेहा धूपियाच्या साडीतील फोटोला नेटिझन्सने म्हटले ‘झेब्रा क्रॉसिंग’, पहा फोटो !

नेहा धूपियाच्या साडीतील फोटोला नेटिझन्सने म्हटले ‘झेब्रा क्रॉसिंग’, पहा फोटो !

िनेत्री नेहा धूपिया सध्या टीव्ही चॅट शो ‘नो फिल्टर विद नेहा-२’मुळे चर्चेत आहे. शिवाय ती तिच्या सोशल अकाउंमुळेही नेटिझन्समध्ये लोकप्रिय ठरत आहे. वास्तविक नेहा इतर सेलेब्सप्रमाणे सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह असते. सध्या नेहाचा एक फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये नेहाने साडी परिधान केली आहे. या साडीवर पांढरे आणि काळ्या रंगाच्या रेषा दिसत आहेत; मात्र यामुळे नेहाच्या या फोटोला विचित्र स्वरूपाच्या कॉमेण्ट दिल्या जात आहेत. 

नेहाच्या अकाउंटवर तिच्या या स्टाइल सेन्सवर सातत्याने कॉमेण्ट दिल्या जात असून, एका यूजर्सने लिहिले की, ‘फारसं काही जमलं नाही’, आणखी एका यूजर्सने लिहिले, ‘तुला साडी शोभून दिसत नाही.’ सोउल्ड मीरा नावाच्या यूजर्सने नेहाला सल्ला देताना लिहिले की, ‘दीपिका आणि कॅटरिनाकडे जा आणि साडी कशी घालावी हे शिकून ये.’ एका यूजर्सने तर हाइटच केली. त्याने नेहाच्या या फोटोला चक्क ‘झेब्रा क्रॉसिंग’ असे संबोधले. नेहाने तिचा हा फोटो तीन तासांपूर्वीच शेअर केला आहे. आतापर्यंत या फोटोला १३ हजार २०५ लोकांनी लाइक केले आहे. 



गेल्या २७ आॅगस्टला नेहा धूपियाचा वाढदिवस होता. ३७ व्या वाढदिवसानिमित्त तिने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये निर्माता करण जोहर, गर्भवती सोहा अली खान, कुणाल खेमू, मलाइका अरोरा, हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजेन खान, प्रीती झिंटा, मनीष मल्होत्रा, मनीष पॉल, सोफी चौधरी, सायरस साहूकार, डिनो मोरिया, संजय कपूर त्याचबरोबर अरशद वारसी पत्नी मारिया गोरेटसोबत उपस्थित होते. 
 

सध्या नेहा तिच्या चॅट शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असून, त्यांच्या पर्सनल आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे या शोच्या माध्यमातून होत आहेत. काही दिवसांपूर्वीच सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री क्रिती सॅनन यांच्यातील रिलेशनशिपविषयीचा खुलासा नेहाने केला होता. दोघेही प्रेमात असल्याचे नेहाने म्हटले होते. 

Web Title: Netizens said in a photo of Neha Dhupia sari, "Zebra crossing", see photo!