सारा अली खानच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर केले जातेय तिचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 18:37 IST2019-08-06T18:36:32+5:302019-08-06T18:37:44+5:30

सारा अली खान ही स्टार किड असली तरी तिला कोणत्याच गोष्टीचा गर्व नाहीये असे म्हटले जाते. साराच्या नुकत्याच केलेल्या एका कृत्यामुळे ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

Netizens hail Sara Ali Khan for carrying her own luggage: She doesn't behave like a star kid | सारा अली खानच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर केले जातेय तिचे कौतुक

सारा अली खानच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर केले जातेय तिचे कौतुक

ठळक मुद्देसारा तिचे लगेज ट्रॉलीतून घेऊन जाताना आपल्याला दिसत आहे. खूपच कमी सेलिब्रेटी विमानतळावर स्वतःचे लगेच स्वतः घेऊन जातना दिसतात. साराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याच गोष्टीमुळे सध्या साराचे कौतुक केले जात आहे. 

सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील तिच्या परफॉर्मन्सची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर ती सिम्बा या चित्रपटात झळकली. साराचा अभिनय पाहाता तिला लम्बी रेस का घोडा मानले जात आहे. साराने आतापर्यंत केवळ दोन चित्रपटात काम केले असले तरी तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या मुलीचे तिच्या अभिनयासाठी कौतुक केले जाते. पण त्याचसोबत साराच्या स्वभावासाठी देखील तिची नेहमीच प्रशंसा केली जाते.

सारा अली खान ही स्टार किड असली तरी तिला कोणत्याच गोष्टीचा गर्व नाहीये असे म्हटले जाते. साराच्या नुकत्याच केलेल्या एका कृत्यामुळे ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. सारा अली खानला नुकतेच लखनऊ विमानतळावर पाहाण्यात आले. कार्तिक आर्यन आणि सारा यांच्या अफेअरची सध्या चांगलीच चर्चा मीडियात रंगली आहे. आता विमानतळावर कार्तिक आणि सारा एकमेकांनाअलिंगन देत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पण त्यासोबत आणखी एका गोष्टीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कार्तिकला अलिंगन दिल्यानंतर सारा विमानतळाच्या आत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी चक्क ती तिचे लगेज ट्रॉलीतून घेऊन जाताना आपल्याला दिसत आहे. खूपच कमी सेलिब्रेटी विमानतळावर स्वतःचे लगेच स्वतः घेऊन जातना दिसतात. साराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याच गोष्टीमुळे सध्या साराचे कौतुक केले जात आहे. 

साराचा हा व्हिडिओ पाहून तिच्या एका फॅनने लिहिले आहे की, तुम्ही बॉलिवूड स्टार असल्याने स्वतःचे सामान उचलू शकत नाहीत असे अनेकांना वाटते. पण स्टार देखील आपले काम स्वतः करू शकतात हेच साराच्या वागणुकीतून आपल्याला दिसून येत आहे. 

कार्तिक सध्या पती पत्नी और वो या चित्रपटाचे चित्रीकरण लखनऊमध्ये करत असून या चित्रपटात त्याच्यासोबत आपल्याला अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सारा आणि कार्तिक दोघे गेल्या काही दिवसांपासून लखनऊमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत होते. पण आता सारा लखनऊवरून परतली आहे. 

Web Title: Netizens hail Sara Ali Khan for carrying her own luggage: She doesn't behave like a star kid