काय २५ दिवसांनंतर सुरू होणार सेक्रेड गेम्स... वाचा कोणी दिला हा संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 15:35 IST2019-05-21T15:32:00+5:302019-05-21T15:35:57+5:30

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे सेक्रेड गेम्स २ पुढील २५ दिवसांत सुरू होईल असा अंदाज लावण्यात येत आहे.

Netflix drops major hint about Sacred Games 2 release date | काय २५ दिवसांनंतर सुरू होणार सेक्रेड गेम्स... वाचा कोणी दिला हा संकेत

काय २५ दिवसांनंतर सुरू होणार सेक्रेड गेम्स... वाचा कोणी दिला हा संकेत

ठळक मुद्देनेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुक्कू (कुबरा सैट), काटेकर (जितेंद्र जोशी), बंटी (जतिन सरना) आणि अंजली माथुर (राधिका आपटे) यांच्या चौघांचा फोटो पोस्ट करत २५ दिवसांत शाळा सुरू होणार असल्याचे पोस्टवर म्हटले आहे.

सेक्रेड गेम्सच्या यशानंतर या वेबसिरिजचे चाहते सेक्रेड गेम्स २ ची आतुरतेने वाट पाहात आहेत. सेक्रेड गेम्स २ कधी सुरू होणार याविषयी नेटफ्लिक्सने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना संकेत दिला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे सेक्रेड गेम्स २ पुढील २५ दिवसांत सुरू होईल असा अंदाज लावण्यात येत आहे.

नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुक्कू (कुबरा सैट), काटेकर (जितेंद्र जोशी), बंटी (जतिन सरना) आणि अंजली माथुर (राधिका आपटे) यांच्या चौघांचा फोटो पोस्ट करत २५ दिवसांत शाळा सुरू होणार असल्याचे पोस्टवर म्हटले आहे. विशेष म्हणजे हे चार जणं छोटे असताना कसे दिसत असतील, हे आपल्याला या फोटोत पाहायला मिळत आहे. मोबाईलमधील एका अॅपलिकेशनचा वापर करून हा इफेक्ट देण्यात आला आहे. तसेच या चौघांचाही मृत्यू झाल्याचे सिक्रेड गेम्सच्या पहिल्या भागात पाहायला मिळाले होते. या चौघांचेच फोटो शेअर करून त्यांना काय सांगायचे आहे हे कळत नाहीये. पण फोटो सोबत असलेल्या कॅप्शन पाहून सेक्रेट गेम्स २५ दिवसांत सुरू होणार असल्याचे नेटिझन्स म्हणत आहेत. एवढेच नव्हे तर २५ दिवसात सेक्रेड गेम्स २ सुरू न झाल्यास आम्हाला खूप वाईट वाटेल असे देखील त्यांनी म्हटले आहे. 

नेटफ्लिक्सच्या या पोस्टनंतर आता सेक्रेट गेम्सचे चाहते प्रचंड खुश झाले आहेत. कारण त्यांच्या आवडत्या वेबसिरिजचा दुसरा सिझन केवळ २५ दिवसात त्यांना पाहायला मिळणार आहे. 

‘सेक्रेड गेम्स 2’च्या या प्रोमोत सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत रणवीर शौरी आणि कल्की कोच्लिन दिसले. पहिल्या सीझनमध्ये नवाजुद्दीन आणि पंकज त्रिपाठी यांची भूमिका प्रेक्षकांना कमालीची भावली होती. दुसऱ्या सीझनमधील त्यांचे नवे लूक पाहून चाहत्यांचे क्रेज वाढले. 



 

२०१८ मध्ये या सीरिजचे पहिले सीझन आले होते. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित केलेली ही सीरिज विक्रम चंद्रा यांच्या  ‘सेक्रेड गेम्स’ या कादंबरीवर आधारित आहे. पहिल्या सीझनमध्ये गणेश गायतोंडेचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले होते. पण ‘सेक्रेड गेम्स 2’ मध्ये तो परतताना दिसतोय. साहजिकच त्यामुळे या वेबसिरिजचे चाहते खूश झाले आहेत. गणेश गायतोंडे ही भूमिका अभिनेता नवाजुद्दीनने साकारली होती तर सैफ अली खान सरताज या भूमिकेत दिसला होता.  

Web Title: Netflix drops major hint about Sacred Games 2 release date