ना इटली, ना पॅरिस; मुंबईतच होणार दीपिका पादुकोण व रणवीर सिंगचे लग्न!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 16:21 IST2018-03-06T10:51:34+5:302018-03-06T16:21:34+5:30
लवकरच बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नमंडप सजणार आहे. होय, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे लव्ह बर्ड्स लवकरचं लग्न ...
.jpg)
ना इटली, ना पॅरिस; मुंबईतच होणार दीपिका पादुकोण व रणवीर सिंगचे लग्न!!
वकरच बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नमंडप सजणार आहे. होय, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे लव्ह बर्ड्स लवकरचं लग्न करणार अशी ताजी बातमी आहे. अलीकडे दीपिकाचे आई-वडिल बेंगळुरूवरून मुंबईत आले होते. येथे त्यांनी रणवीरच्या कुटुंबाची भेट घेतली. सूत्रांचे मानाल तर पादुकोण आणि सिंग कुटुंबाच्या या बैठकीत दीपिका व रणवीरच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. या बैठकीनंतर दोन्ही कुटुंब वरळीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये डिनरसाठी गेले.
खरे तर दीपिका व रणवीर या दोघांनाही डेस्टिनेशन वेडिंग हवे होते. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका व रणवीर दोघांच्याही पालकांची हे लग्न मुंबईत व्हावे अशी इच्छा आहे. विशेषत: रणवीरच्या कुटुंबाचा यासाठी आग्रह आहे. कारण रणवीरचे सगळे नातेवाईक दिल्ली व मुंबईत राहतात. कुणालाही रणवीरचे लग्न मिस करायचे नाही. त्यामुळे लग्न मुंबईत व्हावे, असा त्यांचा आग्रह आहे. हे लग्न साऊथच्या प्रथापरंपरेनुसार होईल, असेही कळतेय. यासाठी मुंबईतील काही अलिशान वेन्यूंवर विचार केला जात आहे. यानंतर मुंबईतीलच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शन दिले जाणार असल्याचे कळतेय.
दीर्घकाळापासून दीपिका व रणवीर या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा होतेय. पण रणवीर किंवा दीपिका या दोघांनी कधीही अधिकृतपणे हे नाते मान्य केले नाही. यापूर्वी दीपिका व रणवीरच्या अतिशय जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने दीपिका व रणवीरने लग्नाचा निर्णय घेतला असल्याची बातमी आली होती. दीपिका व रणवीर दोघेही ‘पद्मावत’च्या रिलीजच्या प्रतीक्षेत होते. या चित्रपटात दोघांनीही साकारलेल्या संवेदनशील भूमिका बघता, दीपिका व रणवीरने ‘पद्मावत’ रिलीज होईपर्यंत संयम दाखवला. केवळ या चित्रपटामुळे दोघेही अंतर राखून होते. पण आता ‘पद्मावत’ रिलीज झाल्यानंतर दीपिका व रणवीर दोघेही आपले रिअल लाईफ रिलेशन लोकांसमोर मान्य करण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत, असे या सूत्रांनी म्हटले होते.
ALSO READ : पुन्हा एकदा संजय लीला भन्साळींच्या जाळ्यात अडकले रणवीर सिंग व दीपिका पादुकोण!