शाहरुखने केला होता नील नितीन मुकेशचा अपमान? १४ वर्षानंतर अभिनेत्याने सांगितलं सत्य, म्हणाला- त्यांनी माझा अपमान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 13:21 IST2023-08-10T13:13:58+5:302023-08-10T13:21:01+5:30

२००९ चा फिल्मफेअर अवॉर्ड शो दरम्यान हा प्रकार घडला होता.

Neil nitin mukesh reveals why he apparently insulted shah rukh khan asked to shut up at 2009 filmfare awards | शाहरुखने केला होता नील नितीन मुकेशचा अपमान? १४ वर्षानंतर अभिनेत्याने सांगितलं सत्य, म्हणाला- त्यांनी माझा अपमान...

शाहरुखने केला होता नील नितीन मुकेशचा अपमान? १४ वर्षानंतर अभिनेत्याने सांगितलं सत्य, म्हणाला- त्यांनी माझा अपमान...

बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकांचे करिअर उद्धवस्त करण्याचा आरोप मोठ मोठ्या कलाकारांवर केला जातो..२००९ चा फिल्मफेअर अवॉर्ड  शो मधील एक व्हिडिओ क्लिप अनेकदा व्हायरल होत असतो. यात स्टेजवर शाहरूख खान नीलच्या नावाची खिल्ली उडवताना दिसत होता. हे पाहून नील शाहरुखवर संतापला होता आणि त्याचा अपमान केला. पण ते खरंच घडलेलं का? नील नितीन मुकेशने अनेक वर्षांनीी आता यावर प्रतिक्रिया दिली असून, सत्य काय घडले होते ते सांगितले आहे.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत नील नितीन मुकेशला त्या क्लिपबद्दल विचारण्यात आला. यावर अभिनेत्याने सांगितलं, त्याने कधीच शाहरुख खानचा किंवा त्याने माझा अपमान केला नाही. दोघांनाही माहिती होते ते एकेमकांची मस्करी करतायेत.  

 2009च्या  फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचं मध्ये सैफ अली आणि शाहरुख खान सूत्रसंचालन केलं होतं.  नील नितीन मुकेश हे सर्व फर्स्ट नेम आहेत. यात सरनेम कुठे आहे? असे शाहरूख सैफ म्हणतात. आम्हा सर्वांचे सरनेम खान, रोशन आहे. तुला सरनेम का नाही? यानंतर मात्र नील  बोलू लागतो. सर, खूप चांगला प्रश्न आहे. मला वाटतं हा माझा अपमान आहे. हे योग्य नाही. मला वाटते की माझे वडीलही इथे बसले आहेत हे तुम्ही पाहिले नाही का. मला वाटते तुम्ही लोकांनी गप्प बसायला हवे. मला माफ करा.'

जेव्हा नील नितीन मुकेशला विचारण्यात आले की संपूर्ण प्रकार स्क्रिप्टेड होता का? तर अभिनेता म्हणाला, तुम्ही म्हणाल तर मी तुमच्यावर विश्वास ठेवेन. याला स्क्रिप्टेड म्हणायचे असेल तर ठीक आहे, पण त्यात प्रेम होते. त्यांनी मला आधीच सांगितले होते की 'मी तुझ्यासोबत काही मजा मस्ती करेन.' म्हणून मी विचारले, 'सर, आपण कोणत्या गंमती बाबत बोलतोय?' ते म्हणाला,  तुला यावर जी प्रतिक्रिया द्यायची ती दे. त्याने मला ते स्वातंत्र्य दिले, म्हणून मी ते केले. माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा मी कधीही अनादर करणार नाही. मुकेशचे कुटुंबीय कधीही कोणाचा अपमान करणार नाहीत.

Web Title: Neil nitin mukesh reveals why he apparently insulted shah rukh khan asked to shut up at 2009 filmfare awards