Cuteness overload : या अभिनेत्याच्या मुलीचा सोशल मीडियावर आहे बोलबाला, जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 11:21 IST2019-10-21T11:19:25+5:302019-10-21T11:21:31+5:30

बापलेकीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होतोय.

Neil nitin mukesh dancing with daughter nurvi shares video on instagram | Cuteness overload : या अभिनेत्याच्या मुलीचा सोशल मीडियावर आहे बोलबाला, जाणून घ्या कोण आहे ती?

Cuteness overload : या अभिनेत्याच्या मुलीचा सोशल मीडियावर आहे बोलबाला, जाणून घ्या कोण आहे ती?

अभिनेता नील नितिन मुकेशचा बायपास रोड 1 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमात तो एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. नील सिनेमांशिवाय कुटुंबियांसोबत सुद्धा तेवढाच वेळ देतो. नील नुकताच मुलीसोबतचा एक क्युट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 


व्हिडीओमध्ये नील मुलगी नुरवी सोबत 'बायपास रोड' सिनेमाच्या गाण्यात 'तन्हा मेरा प्यार' या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. नील नुरवीचा हात पकडून डान्स करताना दिसतेय आणि नुरवीसोबत डान्स एन्जॉय करतेय. 


बायपासचे दिग्दर्शन नमन नितिन मुकेश करतोय.  नमनने याआधी बिजॉय नांबियार आणि अब्बास मस्तान यांच्यासोबत सहदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. अनेक जाहिरातीही त्याने दिग्दर्शित केल्या आहेत. नमनचा हा चित्रपट एक थ्रीलर ड्रामा आहे. नीलसह अभिनेत्री शमा सिकंदर यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवणार आहे. अदा शर्मा, गुल पनाग आणि रजित कपूर यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत.


लहान भावासोबत काम करताना साहजिकच नील प्रचंड उत्साहित आहे. नील यात एका दिव्यांगाची भूमिका साकारताना दिसणार आहे.  नील-नमन या जोडीचा  ‘बाईपास रोड’ प्रेक्षकांना कोणता प्रवास घडवतात आणि या प्रवासाचे फलित काय, ते बघूच.

Web Title: Neil nitin mukesh dancing with daughter nurvi shares video on instagram