प्रिया प्रकाशची नकल करताच व्हायरल झाली नेहा कक्कड; पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 17:03 IST2018-03-11T11:32:57+5:302018-03-11T17:03:05+5:30

सध्या सर्वत्र व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशची चर्चा आहे. प्रत्येक जण तिच्या प्रेमात पडताना दिसत असून, तिच्या अदा लोकांना घायाळ करीत आहेत.

Neha Kukkad became viral after copying Priya Prakash; Watch video! | प्रिया प्रकाशची नकल करताच व्हायरल झाली नेहा कक्कड; पाहा व्हिडीओ!

प्रिया प्रकाशची नकल करताच व्हायरल झाली नेहा कक्कड; पाहा व्हिडीओ!

लिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड सध्या तिच्या एका व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे नेहा या व्हिडीओमध्ये काहीही बोलताना दिसत नाही, शिवाय आपल्या सुरेली आवाजाची जादूही दाखवित नाही. केवळ डोळ्यांच्या इशाºयांनीच ती चाहत्यांना घायाळ करीत आहे. वास्तविक ती या व्हिडीओमध्ये इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या प्रिया प्रकाश वॉरियरची नकल करताना बघावयास मिळत आहे. तिचा हा अंदाज यूजर्सला प्रचंड भावत असून, तिचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. 

आपल्या आवाजाने लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारी नेहा कक्कड सध्या मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर हिच्या प्रेमात पडल्याचे दिसत आहे. नेहा प्रियाच्या क्रेझीनेसवर फिदा झाली असून, तिची नकल करताना दिसत आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती प्रियाप्रमाणेच बोटांनी बंदूक चालविताना दिसत आहे. नेहाचे एक्सप्रेशन खूपच चांगले असून, चाहते तिच्या या अंदाजावर फिदा झाले आहेत. वास्तविक हा तोच व्हिडीओ ज्यामुळ प्रिया प्रकाश वॉरियर नॅशनल क्रश बनली. या व्हिडीओमध्ये प्रिया बोटांनी बंदूक चालविताना दिसते. 
 

दरम्यान, नेहाने हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, प्रिया प्रकाश वॉरियरचा काहीसा प्रभाव माझ्यावरही आहे. नेहाचा हा व्हिडीओ सध्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे. 

Web Title: Neha Kukkad became viral after copying Priya Prakash; Watch video!