confirm! प्रेग्नंट आहे नेहा धूपिया; सोशल मीडियावर शेअर केले बेबी बम्पचे फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 18:57 IST2018-08-24T18:56:20+5:302018-08-24T18:57:34+5:30

नेहाने सोशल मीडियावर आपल्या बेबी बम्पसह फोटो शेअर केले आहेत. या फोटोत नेहा आणि अंगद प्रेग्नंसी फोटोशूट करताना दिसत आहेत.

neha dhupia pregnancy confirmes after 3 months of marriage | confirm! प्रेग्नंट आहे नेहा धूपिया; सोशल मीडियावर शेअर केले बेबी बम्पचे फोटो!!

confirm! प्रेग्नंट आहे नेहा धूपिया; सोशल मीडियावर शेअर केले बेबी बम्पचे फोटो!!

नेहा धूपियाने घाईघाईत लग्न केले आणि वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले. होय, लग्नापूर्वीचं नेहा प्रेग्नंट असल्याची चर्चा कानोकानी झाली. खरे तर नेहा, तिचा पती अंगद बेदी, नेहाची फॅमिली सगळ्यांनी ही चर्चा खोटी ठरवली. या सगळ्या चर्चा अफवा असल्याचे सगळ्यांनीचं छातीठोकपणे सांगितले. पण असे नव्हतेच. नेहा लवकरच आई होणार आहे आणि आता हे जगजाहिर झाले आहे. खुद्द नेहाने सोशल मीडियावर आपल्या बेबी बम्पसह फोटो शेअर केले आहेत. या फोटोत नेहा आणि अंगद प्रेग्नंसी फोटोशूट करताना दिसत आहेत.




लग्नानंतर फेमिना मिस इंडिया २०१८ च्या एका इव्हेंटमध्ये नेहा पोहोचली होती. या इव्हेंटमध्ये तिचे वाढलेले वजन पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नेहा अचानक इतकी जाड कशी होऊ शकते, असा प्रश्न विचारला गेला होता. पण आता याचे उत्तर मिळाले आहे.

अभिनेत्री नेहा धूपियाने गत १० मे रोजी अंगद बेदीसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली होती.. नेहा व अंगद अनेकवर्षांपासून एकमेकांचे मित्र होते. खरे तर चार वर्षांपूर्वीच अंगदने नेहाला लग्नासाठी प्रपोज केले होते. पण तेव्हा नेहा कुण्या दुसऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण हे रिलेशनशिप तुटल्यानंतर नेहा व अंगद यांची जवळीक वाढली आणि दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा मुलगा म्हणजेच अंगद बेदी याने क्रिकेट विश्वात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. दिल्लीच्या रणजी संघाकडून सुरुवातीला काही वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या अंगदने त्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रेमो डिसूझा दिग्दर्शित ‘फालतू’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याशिवाय ‘उंगली’, ‘पिंक’, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांतूनही तो झळकला होता.

 

Web Title: neha dhupia pregnancy confirmes after 3 months of marriage