काय म्हणता, नीतू सिंग यांनीच दिला रणबीर-आलियाला लिव्ह-इनमध्ये राहण्याचा सल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 13:22 IST2019-04-25T13:21:30+5:302019-04-25T13:22:05+5:30

आलिया भट आणि रणबीर कपूर यांचे नाते आता कुणापासूनही लपलेले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आलिया व रणबीर लग्न करणार, अशी चर्चा आहे. याचवर्षांत दोघे बोहल्यावर चढणार, असेही म्हटले जातेय.  पण खरे सांगायचे तर तूर्तास तरी त्यांचा लग्नाचा कुठलाही प्लान नाही. पण एक दुसरा प्लान मात्र त्यांच्याकडे तयार आहे.

Neetu Kapoor wants son Ranbir Kapoor to move in with Alia Bhatt | काय म्हणता, नीतू सिंग यांनीच दिला रणबीर-आलियाला लिव्ह-इनमध्ये राहण्याचा सल्ला?

काय म्हणता, नीतू सिंग यांनीच दिला रणबीर-आलियाला लिव्ह-इनमध्ये राहण्याचा सल्ला?

ठळक मुद्दे रणबीर कतरीना कैफसोबत लिव्ह-इनमध्ये होता.

आलिया भट आणि रणबीर कपूर यांचे नाते आता कुणापासूनही लपलेले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आलिया व रणबीर लग्न करणार, अशी चर्चा आहे. याचवर्षांत दोघे बोहल्यावर चढणार, असेही म्हटले जातेय.  पण खरे सांगायचे तर तूर्तास तरी त्यांचा लग्नाचा कुठलाही प्लान नाही. पण एक दुसरा प्लान मात्र त्यांच्याकडे तयार आहे. होय, तो म्हणजे, लग्नापूर्वी लिव्ह इनमध्ये राहण्याचा.  तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण रणबीरची मॉम नीतू कपूर यांनीच ही कल्पना आलिया व रणबीरला सुचवली आहे.


विशेष म्हणजे, मॉमची ही कल्पना रणबीर व आलियालाही आवडली. त्यामुळेच लगेच नव्या घराचा शोधही सुरु झाला. तूर्तास रणबीर त्याच्या मॉम-डॅडसोबत राहतो. पण लवकरच तो आलियासोबत नव्या घरात शिफ्ट होईल, असे मानले जात आहे. आता रणबीर व आलियाने लिव्ह-इनमध्ये राहावे, यामागे नीतू सिंग यांचा काय तर्क आहे, काय विचार आहे, हे त्यांनाच ठाऊक. पण त्यांनी हा सल्ला विचारपूर्वक दिला असावा, यात मात्र जराही शंका नाही. तशीही आलिया लग्नासाठी अद्याप तयार नाही. खुद्द आलियाचे कुटुंबही तिने लग्नाचा निर्णय घेताना घाई करू नये, या मताचे आहे. कदाचित त्याचमुळे नीतू यांनी हा मध्यममार्ग सुचवला असेल.


यापूर्वी रणबीर कतरीना कैफसोबत लिव्ह-इनमध्ये होता. दीपिका पादुकोणसोबत  ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कॅटच्या प्रेमात पडला आणि यानंतर काहीच महिन्यांत दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी तो निर्णय अमलात आणला आणि लिव्ह-इनमध्ये राहू लागले. पण एकत्र आल्याच्या काही महिन्यांतच दोघांचेही ब्रेकअप झाले होते. रणबीरच्या आयुष्यातून कॅट आऊट झाली आणि पाठोपाठ आलियाची एन्टी झाली. 

Web Title: Neetu Kapoor wants son Ranbir Kapoor to move in with Alia Bhatt