अनंतच्या प्री वेडिंगमध्ये नीता अंबानी अन् इशाची डान्सिंग जुगलबंदी; 'घर मोरे परदेसियाँ'वर केला परफॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 12:15 PM2024-03-06T12:15:24+5:302024-03-06T12:15:57+5:30

Neeta ambani and isha: उपस्थितांच्या नजरा या मायलेकीच्या नृत्यकौशल्यावर खिळल्या होत्या.

neeta-ambani-and-daughter-isha-perform-to-ghar-more-pardesia-at-the-anant-and-radhika-pre-wedding | अनंतच्या प्री वेडिंगमध्ये नीता अंबानी अन् इशाची डान्सिंग जुगलबंदी; 'घर मोरे परदेसियाँ'वर केला परफॉर्म

अनंतच्या प्री वेडिंगमध्ये नीता अंबानी अन् इशाची डान्सिंग जुगलबंदी; 'घर मोरे परदेसियाँ'वर केला परफॉर्म

देशातील श्रीमंत व्यक्ती असा नाव लौकिक असलेल्या मुकेश अंबानी (mukesh ambani) यांच्या घरी सध्या लग्नाची धामधूम सुरु आहे. मुकेश यांचा धाकटा लेक अनंत लवकरच वीरेन मर्चंट यांच्या एकुलत्या एक लेकीसोबत राधिकासोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या या दोन्ही घरी लग्नाची गडबड सुरु आहे. नुकताच जामनगरमध्ये १-३ मार्च या काळात राधिका-अनंतचा (radhika and anant) प्री-वेडिंग सोहळा पार पडला या कार्यक्रमात नीता अंबानी आणि इशा अंबानी या मायलेकीच्या जोडीने खास नववधूच्या स्वागतासाठी डान्स परफॉर्मन्स केला.

राधिका-अनंत यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात देशविदेशातील राजकीय व्यक्ती, सुपरस्टार, क्रिडापटू यांसारख्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यात बॉलिवूड कलाकार आणि अंबानी परिवारातील सदस्यांनी तर अनेक स्टेज परफॉर्मन्स सादर केले. यात नीता आणि इशा (neeta ambani and isha) या दोघींच्या डान्सने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. या दोघींनी 'कलंक' या सिनेमातील 'घर मोरे परदेसियाँ' या गाण्यावर अफलातून डान्स केला.

नीता अंबानी या भरतनाट्यममध्ये विशारद आहेत हे साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे त्यांच्या नृत्यकौशल्याचे अनेक चाहते आहेत. परंतु, अनंतच्या प्री वेडिंगमध्ये त्यांना लेकीने इशानेही साथ दिली. यावेळी इशा आणि नीता अंबानी या दोघींनीही सारख्याच रंगाचे कपडे परिधान केले होते. इशा-निता अंबानीने गुलाबी रंगाची सिक्वेनची साडी नेसली होती. या दोघींनी 'घर मोरे परदेसिया' या गाण्यावर सुरेख डान्स सादर केला.

Web Title: neeta-ambani-and-daughter-isha-perform-to-ghar-more-pardesia-at-the-anant-and-radhika-pre-wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.