​‘नीरजा’मधील दहशतवादी दिसणार ‘पद्मावती’मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 20:45 IST2016-11-19T20:45:44+5:302016-11-19T20:45:44+5:30

‘नीरजा’मध्ये दहशतवादी खलील ही भूमिका साकारणार जिम सर्भ ‘पद्मावती’मध्ये दिसणार आहे. नीरजामध्ये सोनम कपूरसह अन्य कलाकारांच्या कामाचे कौतुक करण्यात ...

'Neeraj' terrorist will appear in Padmavati | ​‘नीरजा’मधील दहशतवादी दिसणार ‘पद्मावती’मध्ये

​‘नीरजा’मधील दहशतवादी दिसणार ‘पद्मावती’मध्ये

ong>‘नीरजा’मध्ये दहशतवादी खलील ही भूमिका साकारणार जिम सर्भ ‘पद्मावती’मध्ये दिसणार आहे. नीरजामध्ये सोनम कपूरसह अन्य कलाकारांच्या कामाचे कौतुक करण्यात आले होते. आता ‘नीरजा’ मधील हा दहशतवादी युवक ‘पद्मावती’मध्ये महत्त्वाची भूमिकेत दिसणार आहे. 

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, त्यात असलेल्या कलावंताची यादी आता समोर येत आहे. पद्मावतीमध्ये दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, शाहिद कपूरसह अदिती राव हैदरी यांच्या भूमिका आहेत. यासोबतच ‘नीरजा’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेला जिम सर्भ देखील ‘पद्मावती’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

पद्मावतीची सध्या शूटिंग सुरू असून, या शूटिंगदरम्यान जिमच्या नावाचा उल्लेख झाल्याने ही बातमी उघड झाली आहे. पद्मावतीमध्ये जिमची भूमिका कोणती असणार हे जरी सध्या गुलदस्त्यात असले तरी त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे. पद्मावतीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय लीला भन्साळी यांनी जिमच्या आॅडिशनची टेप पाहिल्यावर त्याला या चित्रपटात भूमिका देण्याचे ठरविले. त्याच्या पात्राची माहिती आम्ही आता सांगू शकत नाही. मात्र एक कलाकार म्हणून त्याच्या अभिनयाचे पैलू तुम्हाला पाहयाला मिळतील. 

मुंबईच्या पारशी कुुटुंबात जन्मलेला जिम थिअटर आर्टिस्ट असून, त्याच्या कामाची दखल ‘फोर्ब्स इंडिया’ मॅगझिनने घेतली आहे. संजय लीला भन्साळी यांचा आगामी पद्मावती हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे. 

Web Title: 'Neeraj' terrorist will appear in Padmavati