नीना गुप्तांनी शेअर केला खास अल्बम; ओळखा पाहू कोण आहेत हे बॉलिवूड स्टार्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 10:58 IST2019-06-24T10:52:31+5:302019-06-24T10:58:08+5:30

सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एक यादगार आणि अनोखा अल्बम शेअर केला आहे. होय, हा अल्बम पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल.

neena gupta shared pictures of legendary actors during their nsd times | नीना गुप्तांनी शेअर केला खास अल्बम; ओळखा पाहू कोण आहेत हे बॉलिवूड स्टार्स!

नीना गुप्तांनी शेअर केला खास अल्बम; ओळखा पाहू कोण आहेत हे बॉलिवूड स्टार्स!

ठळक मुद्दे नीना यांनी शेअर केलेले फोटो पाहून स्वत: सतीश कौशिक यांनी कमेंट केली आहे. हे सगळे फोटो पाहिल्यानंतर या सर्वांनी अभिनेता बनण्याची हिंमत कशी केली असावी? हाहाहा, असे त्यांनी लिहिले आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एक यादगार आणि अनोखा अल्बम शेअर केला आहे. होय, हा अल्बम पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. गतकाळातील अनेक लोकप्रिय अभिनेत्यांचे सुरुवातीच्या काळातले फोटो नीना यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. यात अन्नू कपूर, पंकज कपूर, अनुपम खेर अशा दिग्गज कलाकारांचे फोटो आहेत. या सर्वांनी नॅशनल स्कूल  ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला होता, तेव्हाचे हे फोटो आहेत.

सर्वात आधी नीना यांनी स्वत:चा ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे. जेव्हा आम्ही सर्वांनी एकत्र नॅशनल स्कूल  ऑफ ड्रामाची सुरुवात केली होती..., असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

हा फोटो अनुपम खेर यांचा आहे. अनुपम यांनी अनेक संघर्षानंतर स्वत:ची ओळख निर्माण केली.  महेश भट यांच्या ‘सारांश’ या चित्रपटात एका वृद्धाची भूमिका स्वीकारून त्यांनी एक मोठी जोखिम पत्करली. पण या भूमिकेने त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन बसवले.

हा फोटो आहे आलोक नाथ यांचा. अलीकडे मीटू मोहिमेअंतर्गत आलोक नाथ यांच्यावर अनेक गंभीर आरोप  झालेत. आलोक नाथ यांना एनएसडीमध्ये शिक्षण घेत असतानाच रिचर्ड एटेनबर्ग यांच्या ‘गांधी’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटात बेन किंग्स्ले यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली होती.

हा फोटो पंकज कपूर यांचा. दोन राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेले पंकज कपूर आजही बॉलिवूडचे सर्वात लो प्रोफाईल आणि सर्वोत्कृष्ट अभिनेते म्हणून ओळखले जातात.

हा फोटो आहे अन्नू कपूर यांचा. पण त्यांच्या फोटो खाली चुकून अनिल कपूर असे लिहिलेले आहे.

हा फोटो आहे सुश्मिता मुखर्जी यांचा.जीसस अ‍ॅण्ड मेरी कॉलेजमध्ये शिकलेल्या सुश्मिता मुखर्जी यांनी दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्याशी लग्न केले होते. पण कालांतराने त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर त्यांनी अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता राजा बुंदेला यांच्यासोबत लग्न केले.

हा फोटो आहे सतीश कौशिक यांचा. नीना यांनी शेअर केलेले फोटो पाहून स्वत: सतीश कौशिक यांनी कमेंट केली आहे. हे सगळे फोटो पाहिल्यानंतर या सर्वांनी अभिनेता बनण्याची हिंमत कशी केली असावी? हाहाहा, असे त्यांनी लिहिले आहे.
 

Web Title: neena gupta shared pictures of legendary actors during their nsd times