नीना गुप्तांनी शेअर केला नातीचा गोड फोटो, म्हणाल्या- "माझ्या मुलीची मुलगी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 12:07 IST2024-10-14T12:06:01+5:302024-10-14T12:07:10+5:30

आजी झाल्यानंतर नीना गुप्ता यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांनी नातीचा गोड फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.

neena gupta shared photo of her grandchild masaba gupta daughter photo | नीना गुप्तांनी शेअर केला नातीचा गोड फोटो, म्हणाल्या- "माझ्या मुलीची मुलगी..."

नीना गुप्तांनी शेअर केला नातीचा गोड फोटो, म्हणाल्या- "माझ्या मुलीची मुलगी..."

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता नुकत्याच आजी झाल्या आहेत. नीना गुप्तांची मुलगी आणि फॅशन डिझायनर असलेल्या मसाबा गुप्ता हिने गोंडस लेकीला जन्म दिला आहे. ११ ऑक्टोबरला मसाबा आणि सत्यदीप मिश्रा यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. मसाबाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. त्यानंतर आता नीना गुप्ता यांनी नातीबरोबरचा एक गोड फोटो शेअर केला आहे. 

आजी झाल्यानंतर नीना गुप्ता यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांनी नातीचा गोड फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या फोटोला नीना गुप्तांनी "माझ्या मुलीची मुलगी" असं कॅप्शन दिलं आहे. नीना गुप्ता यांच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही नीना गुप्ता यांचं अभिनंदन केलं आहे. 


मसाबा गुप्ताचे हे दुसरं लग्न आहे. याआधी २०१५ मध्ये तिने मधु मंटेनाशी लग्नगाठ बांधली होती. २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. गेल्या वर्षी मसाबाने अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले. सत्यदीपचेही हे दुसरं लग्न आहे. याआधी तो आदिती राव हैदरीचा नवरा होता. २०१३ मध्ये ते वेगळे झाले. मसाबा आणि सत्यदीप आईबाबा झाल्याने आनंदी आहेत. 

Web Title: neena gupta shared photo of her grandchild masaba gupta daughter photo