Googleवालों, अब तो मेरी उम्र घटा दो...! नीना गुप्तांचा फोटो पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल हेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 16:50 IST2020-01-30T12:00:33+5:302020-01-30T16:50:45+5:30

नीना यांनी  ट्विटर एक पोस्ट शेअर केली आणि या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

neena gupta has demand to google for reduce her age | Googleवालों, अब तो मेरी उम्र घटा दो...! नीना गुप्तांचा फोटो पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल हेच

Googleवालों, अब तो मेरी उम्र घटा दो...! नीना गुप्तांचा फोटो पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल हेच

ठळक मुद्देनजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत नीना झळकल्या.

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या परखड व बिनधास्त अंदाजासाठी ओळखल्या जातात. 60 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये कमबॅक करणा-या नीनांचा ‘पंगा’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. तूर्तास नीना गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. होय, नीना यांनी  ट्विटर एक पोस्ट शेअर केली आणि या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या पोस्टसोबत नीना यांनी शेअर केलेला फोटो पाहून तर अनेकजण थक्क झालेत. ‘गुगलवालो अब तो मेरी उम्र कम करके लिख दो,’ अशी लाडीक मागणी नीना यांनी हा फोटो शेअर करताना केली.


 या फोटोत नीना यांनी नवीन हेअरकट केलेली दिसतेय. या हेअरकटमध्ये नीना कमालीच्या सुंदर दिसत आहेत. इतकेच नाही तर त्यांचे वयही लपलेले दिसतेय. याचमुळे आता तर माझे वय कमी लिहा, अशी मजेशीर मागणी त्यांनी केली आहे.


नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत नीना झळकल्या. पण त्यांची सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या एका ‘बोल्ड’निर्णयाने.
8० च्या दशकात त्यांनी घेतलेल्या या निर्णयाची प्रचंड चर्चा झाली. यासाठी त्यांना पराकोटीच्या टीकेला सामोरे जावे लागले. पण स्वतंत्र विचारांच्या नीना जगाची पर्वा न करता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. हा निर्णय होता, वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा.

8० च्या दशकात हा निर्णय मुळातचं क्रांतिकारी निर्णय होता. आजही नीना तितक्याच बोल्ड आहेत. साठी ओलांडल्यानंतरही स्वत:चे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचे धाडस त्यांच्यात आहेत. माज्या  बोल्ड फोटोवर हजारो कमेंट्स येतात. मी त्या एन्जॉय करते, असे त्या अलीकडे म्हणाल्या होत्या. 
 


 

Web Title: neena gupta has demand to google for reduce her age