लवकरच सुटणार सुशांत सिंग रजपूत मृत्यूप्रकरणाचा गुंता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 14:29 IST2021-05-31T14:27:19+5:302021-05-31T14:29:44+5:30
सिद्धार्थ पिठानीला काहीच दिवसांपूर्वी अटक केली आणि आता या मृत्यूप्रकरणात आणखी एक अपडेट हाती आली आहे.

लवकरच सुटणार सुशांत सिंग रजपूत मृत्यूप्रकरणाचा गुंता?
सुशांत सिंग रजपूतने 14 जून 2020 ला जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. त्याच्या निधनाला जून महिन्यात एक वर्षं पूर्ण हाईल. एनसीबीने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी असणाऱ्या सिद्धार्थ पिठानीला काहीच दिवसांपूर्वी अटक केली आणि आता या मृत्यूप्रकरणात आणखी एक अपडेट हाती आली आहे.
सिद्धार्थ सिंग रजपूतचा कूक आणि हाऊस हेल्परला पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. सिद्धार्थ अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे त्याच्या कूकनेच पोलिसांना सगळ्यात पहिल्यांदा सांगितले होते. याच बाबत एनसीबीने सुशांतचा कूक आणि त्याच्या हाऊस हेल्परला चौकशीसाठी पुन्हा बोलवले आहे.
सुशांतचा कूक आणि हाऊस हेल्पर काही दिवसांपूर्वी मुंबईच्या बाहेर गेले होते आणि आता पुन्हा ते मुंबईत आले असून दोघे वेगवेगळ्या सेलिब्रेटींकडे काम करत असल्याचे म्हटले जात आहे.