OMG! नवाझुद्दीन सिद्दीकेने चक्क सांगितले होते एका वेटर्ससोबतच्या वन नाईट स्टँडविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 18:27 IST2020-05-25T18:24:15+5:302020-05-25T18:27:00+5:30

नवाझुद्दीन सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या खाजगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोटाची काही दिवसांपूर्वी नोटिस पाठवली आहे.

nawazuddin siddiquis ‘One-Night Stand’ With Waitress & Jewish Girlfriend PSC | OMG! नवाझुद्दीन सिद्दीकेने चक्क सांगितले होते एका वेटर्ससोबतच्या वन नाईट स्टँडविषयी

OMG! नवाझुद्दीन सिद्दीकेने चक्क सांगितले होते एका वेटर्ससोबतच्या वन नाईट स्टँडविषयी

ठळक मुद्देनवाझने सांगितले होते की, तो न्यूयॉर्कमधील एका हॉटेलमध्ये बसला होता. तेथील एक वेटर त्याला सतत पाहात होती. म्हणून तो देखील तिच्याशी बोलायला गेला आणि त्याने ती रात्र तिच्यासोबत घालवली होती.

नवाझुद्दीन सिद्दीकीने त्याच्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. एवढेच नव्हे तर सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत तो चित्रपटांमध्ये झळकला आहे.

नवाझुद्दीन सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या खाजगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोटाची काही दिवसांपूर्वी नोटिस पाठवली आहे. पण नवाझुद्दीनचे खाजगी आयुष्य चव्हाट्यावर येण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. याआधी देखील अनेकवेळा त्याने दिलेल्या स्टेटमेंटमुळेच त्याच्या खाजगी आयुष्याची अधिकाधिक चर्चा झाली आहे.

नवाजने त्याच्या बॉलिवूडमधील संघर्षावर आधारित ऑन ओरडीनरी लाईफः अ मेमोईर ही बायोग्राफी लिहिली होती. पण ही बायोग्राफी चांगलीच वादात अडकली होती. कारण त्याने यात सुनीता राजवार आणि निहारिका सिंग या दोन अभिनेत्रींचा यात उल्लेख केला होता. त्यांच्यासोबतच्या अफेअरबद्दल त्याने सविस्तर लिहिले होते. तसेच काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तर त्याने त्याच्या आयुष्यातील वन नाईट स्टँड विषयी देखील सांगितले होते. टेलिकार्टने दिलेल्या वृत्तानुसार, नवाझने सांगितले होते की, तो न्यूयॉर्कमधील एका हॉटेलमध्ये बसला होता. तेथील एक वेटर त्याला सतत पाहात होती. म्हणून तो देखील तिच्याशी बोलायला गेला आणि त्याने ती रात्र तिच्यासोबत घालवली होती.

एवढेच नव्हे तर नवाझुद्दीनने त्याच्या एका जेविश प्रेयसीविषयी देखील सांगितले होते. तिचे नाव सुझान होते. त्या दोघांची भेट न्यूयॉर्कमध्ये झाली होती. त्यानंतर ते दोघे अनेक दिवस मुंबईत एकत्र राहात होते. पण तिचा व्हिसा संपल्यामुळे तिला तिच्या देशात परतावे लागले होते. 

Web Title: nawazuddin siddiquis ‘One-Night Stand’ With Waitress & Jewish Girlfriend PSC