'या' बॉलिवूड अभिनेत्याला साकारायची आहे ओशोंची भूमिका, 'इफ्फी'मध्ये केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 02:11 PM2023-11-26T14:11:17+5:302023-11-26T14:12:01+5:30

नुकतंच त्याने गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवासाठी हजेरी लावली.

Nawazuddin Siddiqui reveals in Iffi goa tha he wants to play Osho s character in future | 'या' बॉलिवूड अभिनेत्याला साकारायची आहे ओशोंची भूमिका, 'इफ्फी'मध्ये केला खुलासा

'या' बॉलिवूड अभिनेत्याला साकारायची आहे ओशोंची भूमिका, 'इफ्फी'मध्ये केला खुलासा

नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सर्वात प्रभावशाली अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचा स्क्रीनवरील सहज अभिनय प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतो. नुकतंच त्याने गोवा आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवासाठी हजेरी लावली. यावेळी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अभिनेत्याने संवाद साधला. मी सिनेमात केवळ खास भूमिका करतो आणि अशा भूमिकांसाठी मी प्रेक्षकांचे आभार मानतो असं तो यावेळी म्हणाला. 

नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याचा सहज अभिनय सर्वांनाच आपलंसं करुन जातो. गोव्यातील प्रेस कॉन्फरन्समध्ये तो म्हणाला,'मी नेहमीच स्वत:ला एका हटके भूमिकेत पाहू इच्छितो. म्हणूनच मी कायम काही खास भूमिकाच साकारतो. यासाठी प्रेक्षकांनाच मी धन्यवाद देईन. त्यांनी नेहमीच माझ्याकडून हटके भूमिकांची अपेक्षा केली.'

तो पुढे म्हणाला,'जेव्हा कधी हटके भूमिका मिळतात तेव्हा त्यातून खूप काही शिकण्यासारखं असतं. म्हणूनच मी कायम माझ्या वेगळ्या भूमिकांमधून बरंच काही शिकलो आहे. जर मला संधी मिळाली तर मला आध्यत्मिक गुरु ओशो यांची भूमिका साकारण्याची इच्छा आहे.'

नवाजुद्दीनचा आगामी 'रौतू की बेली' हा मर्डर मिस्ट्री सिनेमा रिलीज होतोय. यामध्येत्याने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तसंच नुकताच त्याचा 'हड्डी' सिनेमा रिलीज झाला. यामध्ये त्याने तृतीयपंथियाची भूमिका साकारली होती.

Web Title: Nawazuddin Siddiqui reveals in Iffi goa tha he wants to play Osho s character in future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.