RRR-KGF 2 च्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया, म्हणाला- खरा सिनेमा यात कुठे आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 16:42 IST2022-04-23T16:07:39+5:302022-04-23T16:42:19+5:30

सध्या सिनेसृष्टीत साऊथ चित्रपटांचा बोलबाला आहे. एसएस राजामौलीच्या RRR ते यशच्या KGF Chapter 2 पर्यंतचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

nawazuddin siddiqui cinema kahan hai rrr kgf chapter 2 ott platform | RRR-KGF 2 च्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया, म्हणाला- खरा सिनेमा यात कुठे आहे?

RRR-KGF 2 च्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया, म्हणाला- खरा सिनेमा यात कुठे आहे?

सध्या सिनेसृष्टीत साऊथ चित्रपटांचा बोलबाला आहे. एसएस राजामौलीच्या RRR ते यशच्या KGF Chapter 2 पर्यंत. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटांना देश-विदेशातील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मात्र नवाजुद्दीन सिद्दीकीला हे चित्रपट फारसे आवडले नसल्याचे दिसून येत आहे. नवाजुद्दीनने आपल्या मुलाखतीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बिग बजेट चित्रपटांची खिल्ली उडवली आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतो की, हे चित्रपट शॉक आणि कौतुकाची भावना देतात. हा सगळा व्हिजुअल एक्सपीरिन्स आहे, पण यात खरा सिनेमा कुठे आहे. चित्रपटांमध्ये अजूनही उथळ गोष्टी दाखवल्या जातात आणि त्यात बदल झालेला नाही, असंही तो म्हणाला. आता फक्त बिग बजेटच्या चित्रपटांना थिएटरमध्ये जागा मिळतेय. अशा परिस्थितीत छोट्या बजेटचे चित्रपट थिएटरमध्ये जागा मिळवू शकतील का?

बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीला विचारण्यात आले की, कमर्शियल सिनेमातील मेन लीडची संकल्पना बदलत आहे का? या प्रश्नावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. नवाज म्हणतो, "मला वाटत नाही की ते बदलत आहे. मंटोमध्येही मी मुख्य भूमिका केली होती. पण तो चित्रपट बघायला किती लोक आले? मला वाटले की महामारीच्या दोन वर्षानंतर लोकांनी  वर्ल्ड सिनेमामाही पाहिला असेल आणि त्यात बदल झाला असेल. 

ॉनवाजुद्दीन सिद्दीकीचा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट 'हिरोपंती 2' 29 एप्रिलला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता लैला नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत.
 

Web Title: nawazuddin siddiqui cinema kahan hai rrr kgf chapter 2 ott platform