कोरोनाच्या संकटात ही अभिनेत्री घेतेय फिरण्याचा आनंद, फोटो पाहाताच नेटिझन्सने धरले धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 12:00 IST2020-05-07T11:56:00+5:302020-05-07T12:00:02+5:30

या अभिनेत्रीने तिचे फिरतानाचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Nargis Fakhri Posts Photos And Video With Her Quaran-Team From LA Amid Coronavirus, got trolled PSC | कोरोनाच्या संकटात ही अभिनेत्री घेतेय फिरण्याचा आनंद, फोटो पाहाताच नेटिझन्सने धरले धारेवर

कोरोनाच्या संकटात ही अभिनेत्री घेतेय फिरण्याचा आनंद, फोटो पाहाताच नेटिझन्सने धरले धारेवर

ठळक मुद्देनर्गिसच्या या फोटो आणि व्हिडिओवर तिला लोकांनी चांगलेच सुनावले आहे. सध्या सगळ्यांनी घरी बसण्याची गरज आहे. त्याशिवाय कोरोनाचा फैलाव कमी होणार नाही असे काहींनी तिला कमेंटद्वारे म्हटले आहे

सध्या भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे भारतात 17 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटी देखील घरातच आहेत. प्रत्येकजण घरात राहून आपापल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. सध्या अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय आहेत. अभिनेत्री नर्गिस फाकरी अमेरिकेच्या लॉस एंजलिस शहरात गेल्या काही महिन्यांपासून राहात असून तिथे देखील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. तेथील लोकांना देखील घरीच राहाण्याविषयी सांगण्यात आले आहे. पण नर्गिस शहरात मस्त फिरत असून सोशल मीडियावर त्याचे फोटो, व्हिडिओ देखील पोस्ट करत आहे. यावरून सोशल मीडियावर नेटिझन्सने तिला चांगलेच सुनावले आहे.

नर्गिसने तिचा सायकल चालवतानाचा एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, आज वातावरण खूपच छान आहे. 

एवढेच नव्हे तर नर्गिसने अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिने तिच्या एका मैत्रिणीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत गेल्या दोन वर्षांत मी हे शहर जितके चांगल्याप्रकारे फिरू शकले नाही, तितके मी गेल्या दोन महिन्यांपासून या शहरात फिरत आहे असे लिहिले आहे.

नर्गिसच्या या फोटो आणि व्हिडिओवर तिला लोकांनी चांगलेच सुनावले आहे. सध्या सगळ्यांनी घरी बसण्याची गरज आहे. त्याशिवाय कोरोनाचा फैलाव कमी होणार नाही असे काहींनी तिला कमेंटद्वारे म्हटले आहे तर काहींनी अशा परिस्थितीत तू असे स्टंट का करत आहेस असे तिला विचारले आहे.

Web Title: Nargis Fakhri Posts Photos And Video With Her Quaran-Team From LA Amid Coronavirus, got trolled PSC