नाशिकची अंजली पाटील सुपरस्टार रजनीकांतबरोबर ‘या’ चित्रपटातून झळकणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2017 21:07 IST2017-05-28T15:37:38+5:302017-05-28T21:07:38+5:30
मूळची नाशिकची असलेली अन् मराठीबरोबर अनेक भाषांचे ज्ञान असलेली राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अंजली पाटील लवकरच सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर झळकणार ...

नाशिकची अंजली पाटील सुपरस्टार रजनीकांतबरोबर ‘या’ चित्रपटातून झळकणार!
म ळची नाशिकची असलेली अन् मराठीबरोबर अनेक भाषांचे ज्ञान असलेली राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अंजली पाटील लवकरच सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर झळकणार आहे. अंजलीच्या या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले असून, त्यामध्ये रजनीचा अवतार बघण्यासारखा आहे. अंजलीबरोबरच या चित्रपटात अभिनेत्री हुमा कुरेशी हिचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
‘कबाली’नंतर ‘काला करिकालन’ या चित्रपटातून दमदारपणे प्रेक्षकांसमोर जाणारे अभिनेते रजनीकांत यांच्या या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाचा निर्माता रजनीकांत यांचाच जावई धनुष असून, धनुषनेच चित्रपटाचे पोस्टर ट्विटर अकाउंटवरून रिलीज केले आहे. पा. रंजित दिग्दर्शित हा चित्रपट अंडरवर्ल्डवर आधारित असल्याचे चित्रपटाच्या पोस्टरवरून दिसत आहे. या चित्रपटात नाशिकची अंजली पाटील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून, तिला या चित्रपटातून बºयाचशा अपेक्षा आहेत.
![]()
दरम्यान, धनुषने रिलीज केलेल्या एका पोस्टरमध्ये रजनीकांत यांचा अतिशय उग्र व भयावह अंदाज बघायला मिळत आहे, तर आणखी एका पोस्टरमध्ये ते धारावी झोपडपट्टीच्या समोर उभ्या असलेल्या एका जीपवर बसलेले दिसत आहेत. या चित्रपटात रजनीकांत गॅँगस्टरची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या आयुष्यावर आधारित असल्याची चर्चा होती. परंतु निर्माता धनुषने या चर्चेला पूर्णविराम दिला. धनुषने म्हटले होते की, हाजी मस्तानचा अन् या चित्रपटाचा काहीही संबंध नाही. हा बायोपिक नसून, एक काल्पनिक चित्रपट आहे.
दरम्यान, मराठमोळ्या अंजलीने आपल्यातील भाषा प्रभुत्वाच्या जोरावर अनेक भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘ना बंगेरू तल्ली’ या तामीळ चित्रपटासाठी तर तिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यासाठी तिला ‘स्पेशल ज्युरी अवॉर्ड’ मिळाला आहे. अंजलीने आतापर्यंत हिंदी, तेलगू, सिंहला (श्रीलंकन), मल्याळम्, कन्नडा, इंग्रजी आणि कोकणी या भाषांतील चित्रपटात काम केले आहे. गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अंजलीने सिल्व्हर पीकॉक अवॉर्ड मिळविला होता.