​नागार्जुनची सून समांथा रुथ प्रभूची संपत्ती ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 12:06 IST2018-04-28T06:36:05+5:302018-04-28T12:06:05+5:30

सुपरस्टार अभिनेता नागार्जुनचा लेक नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचे लग्न काहीच महिन्यांपूर्वी झाले. या लग्नाची प्रचंड चर्चा ...

Nagarjuna's daughter Samantha Ruth will listen to the wealth of Lord Ruin and surprise | ​नागार्जुनची सून समांथा रुथ प्रभूची संपत्ती ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

​नागार्जुनची सून समांथा रुथ प्रभूची संपत्ती ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

परस्टार अभिनेता नागार्जुनचा लेक नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचे लग्न काहीच महिन्यांपूर्वी झाले. या लग्नाची प्रचंड चर्चा मीडियामध्ये रंगली होती. तब्बल दहा कोटी रुपये खर्च आलेल्या या सोहळ्याची बातच न्यारी होती. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही धार्मिक पद्धतीने चैतन्य आणि समांथा यांचा विवाहसोहळा पार पडला. ६ आॅक्टोबर रोजी दोघांनी गोवा येथील डब्ल्यू हॉटेलमध्ये हिंदू रितीरिवाजाने लग्न केले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ आॅक्टोबरला नागा चैतन्य आणि समांथा या दोघांनी कॅथलिक रितीरिवाजानुसार लग्न केले. नवदाम्पत्याचा लूक, राजेशाही थाटातील सोहळा, दागदागिने आणि दिग्गजांची उपस्थिती यामुळे हा सोहळा वर्षभरातील सगळ्यात मोठा सेलिब्रिटी लग्नसोहळा ठरला. समांथा ही स्वतः करोडपती आहे तर तिने लग्न देखील एका करोडपती कुटुंबात केले आहे. समांथाकडे किती पैसे आहे हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. 
नागार्जुनची सून समांथाचा जन्म २८ एप्रिल १९८७ ला चेन्नईत झाला. समांथा ही एक प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आहे. दक्षिणेतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. ती कॉलेजमध्ये असताना प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक रवी वर्मन यांची तिच्यावर नजर पडली आणि त्यांनी तिला 'मास्कोविन कावेरी' या चित्रपटाची ऑफर दिली आणि तिचे संपूर्ण आयुष्यच बदलले. समांथा ही एका सामान्य कुटुंबातील आहे. त्यामुळे तिने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अनेक छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या आहेत. आज समांथाकडे करोडोने संपत्ती आहे. समांथा ११ मिलियन डॉलर अर्थातच ७० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. चेन्नईमध्ये तिचा एक अलिशान बंगला आहे तर हैद्राबादमध्ये देखील तिचे भलेमोठे घर आहे. तसेच बीएमडब्ल्यू एक्स3 आणि जगुआर एक्सएफ यांसारख्या अनेक गाड्या तिच्याकडे आहेत. समांथा ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने ती केवळ एका चित्रपटासाठी दोन कोटीहून अधिक मानधन घेते. समांथा नेहमीच बँडेड कपडे घालते. तिचे कपडे हे अनेकवेळा लाखोंमध्ये असतात. समांथा ही फॅशनेबल अभिनेत्री असल्याने तिच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा नेहमीच रंगते. 

Also Read : नागार्जुनची ‘ती’ सून जी एकेकाळी बनली होती त्याची ‘ऑनस्क्रीन आई,जाणून घ्या कोणता आहे तो सिनेमा

Web Title: Nagarjuna's daughter Samantha Ruth will listen to the wealth of Lord Ruin and surprise