'मिस्ट्री वुमन'चा झाला उलगडा, सुशांतच्या आत्महत्येदिवशी गेली होती त्याच्या घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 01:39 PM2020-08-17T13:39:22+5:302020-08-17T13:39:38+5:30

सुशांतच्या बिल्डिंगमध्ये 14 जूनला दिसलेल्या त्या मिस्ट्री वूमनचा झाला उलगडा

'Mystery Woman' unfolded, Sushant had gone to his house on the day of his suicide | 'मिस्ट्री वुमन'चा झाला उलगडा, सुशांतच्या आत्महत्येदिवशी गेली होती त्याच्या घरी

'मिस्ट्री वुमन'चा झाला उलगडा, सुशांतच्या आत्महत्येदिवशी गेली होती त्याच्या घरी

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रोज नवे खुलासे होत आहेत. मुंबई पोलिस, पाटणा पोलिस, ईडीच्या तपासातून काही धक्कादायक बाबी समोर आल्यात. शिवाय सोशल मीडिया व वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातूनही अनेक गोष्टी समोर येत आहेत. आता 14 जूनला सुशांतच्या बिल्डिंगमध्ये कथितरित्या एक मिस्ट्री वूमन दिसल्याचा दावा केला जात होता, त्याचा आता खुलासा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी ज्या संशयित तरूणीचा उल्लेख केला होता ती रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक चक्रवर्तीची मैत्रीण जमीला आहे.


14 जून रोजी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून त्याच्या घरी प्रियंका खेमानी, जमीला आणि महेश शेट्टी गेले होते पण पोलिसांनी त्यांना घराच्या आत येऊ दिले नाही आणि परत पाठवले. दरम्यान जमीला सुशांतच्या घरातील स्टाफ मेंबर्सला भेटून गेली होती.



अभिनेत्याच्या निधनानंतर त्याचा मित्र गणेश हिवरकरने अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. गणेश हिवरकरचा असा दावा आहे की 13 जूनच्या रात्री अभिनेत्याच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी 5 ते 6 जण त्याच्या वांद्रे अपार्टमेंटमध्ये पोहोचले होते.

 

न्यूज 18च्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान गणेश हिवरकर म्हणाला, सप्टेंबर 2019 मध्ये मी सुशांतशी बोललो होतो तेव्हा तो खूप सकारात्मक होता आणि पुढचे प्लॅनिंग करत होता. यानंतर गणेश म्हणाला, 13 जूनच्या रात्री 5 ते 6 लोक सुशांतच्या घरी गेले होते. हीच गोष्ट सुशांतच्या मित्रासोबत (संदीप सिंग) काम करणाऱ्या व्यक्तिने सांगितले. सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू दिशाच्या मृत्यूशी संबंधित असल्याचा दावा गणेशने केला.

Web Title: 'Mystery Woman' unfolded, Sushant had gone to his house on the day of his suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.