‘दुश्मन’ मधील माझा लुक सर्वांत वाईट -काजोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 15:03 IST2016-11-23T15:01:58+5:302016-11-23T15:03:11+5:30

‘बॉलिवूडची सिम्रन’, करण जोहर आणि शाहरूखची खास मैत्रीण, ‘सिंघम’ ची पत्नी, युग-निसाची आई अन् अष्टपैलू कलाकार म्हणून ‘बी टाऊन’ ...

My look in 'enemy' is the worst-case | ‘दुश्मन’ मधील माझा लुक सर्वांत वाईट -काजोल

‘दुश्मन’ मधील माझा लुक सर्वांत वाईट -काजोल

ॉलिवूडची सिम्रन’, करण जोहर आणि शाहरूखची खास मैत्रीण, ‘सिंघम’ ची पत्नी, युग-निसाची आई अन् अष्टपैलू कलाकार म्हणून ‘बी टाऊन’ मध्ये जिला ओळखले जाते अशी काजोल देवगण. अभिनयाने आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा ध्यास असलेल्या काजोलने तिच्या संघर्षाच्या काळात प्रत्येक भूमिका एक संधी म्हणून साकारली. पण, आता तिला असे वाटतेय की, केवळ अभिनय चांगला करून उपयोग नाही तर आपण सुंदर दिसणंही तितकंच महत्त्वाचा असतं. ‘दुश्मन’ मधील तिचा लुक तिला आत्तापर्यंतच्या करिअरमधील सर्वांत वाईट लुक वाटतो. 

१९९८ चा ब्लॉकबस्टर हिट ‘दुश्मन’ संजय दत्त, काजोल, आशुतोष राणा यांच्या दमदार अभिनयाने आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. पण, तुम्हाला हे माहितीये का? काजोलला तिचा या चित्रपटातील लुक बिल्कुल आवडत नाही. तिने चित्रपटात घातलेला विग तिला चांगला दिसेल असे तिला वाटले होते. मात्र, आता तिला तिचा तो सर्वांत वाईट लुक वाटतो. 

‘दुश्मन’ हा चित्रपट थ्रिलरपट आहे. तनुजा चंद्रा दिग्दर्शित आणि मुकेश भट्ट निर्मित चित्रपटात तगडी स्टारकास्ट घेण्यात आली होती. दोन बहिणींची कथा यात उत्तमप्रकारे साकारण्यात आली आहे. काजोलने केलेली दुहेरी भूमिका आजही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. 

Web Title: My look in 'enemy' is the worst-case