माझ्या नवऱ्याची बायको..!, करिश्मा कपूरच्या एक्स हजबँडच्या पत्नीचा फोटो होतोय व्हायरल, चित्रपटात केलंय तिने काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 14:44 IST2021-06-18T14:44:00+5:302021-06-18T14:44:24+5:30
करिश्मा कपूरचा एक्स हजबँड संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेवचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत.

माझ्या नवऱ्याची बायको..!, करिश्मा कपूरच्या एक्स हजबँडच्या पत्नीचा फोटो होतोय व्हायरल, चित्रपटात केलंय तिने काम
नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर भलेही रिल लाइफमध्ये यशस्वी झाली असली तरी ती तिच्या वैवाहिक आयुष्यात अयशस्वी ठरली आहे. ती तिचा नवरा संजय कपूरला घटस्फोट देऊन विभक्त झाली आहे. सध्या संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेवचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. प्रिया सचदेव टॉपची मॉडेल आणि अभिनेत्री राहिली आहे. करिश्मा कपूरचा एक्स हजबँड संजय कपूरची तिसरी बायको बनून ती चर्चेत आली आहे.
प्रियाच्या फिल्मी करिअरची सुरूवात यशराज बॅनरचा चित्रपट नील अँड निक्कीमधून केली होती. या चित्रपटात ती उदय चोप्रा आणि तनिषा मुखर्जीसोबत दिसली होती. मात्र या चित्रपटाचा तिच्या करिअरला काहीच फायदा झाला नाही. प्रिया लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची स्टुडंट राहिली आहे. तसेच ती टॉप मॉडेलदेखील आहे. इतकेच नाही तर प्रिया सचदेवने अमिताभ बच्चन यांच्यासोबत जाहिरातीत काम केले होते.
२०१६ साली करिश्मा कपूरने संजय कपूरला घटस्फोट दिला. त्यांचे लग्न जवळपास १३ वर्षे टिकले. १३ एप्रिल, २०१७ साली बिझनेसमन आणि करिश्मा कपूरचा एक्स हजबँड संजय कपूरने प्रिया सचदेव सोबत दिल्लीत तिसरे लग्न केले होते. प्रिया संजय कपूरची तिसरी पत्नी आहे.
संजय कपूरसोबत लग्न करण्यापूर्वी प्रियाने भारतीय वंशज असलेला अमेरिकन हॉटेल व्यावसायिक विक्रम चटवालशी लग्न केले होते. दहा दिवस चाललेले लग्न जगातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक मानले जाते. मात्र २०११ साली ते दोघे विभक्त झाले. प्रिया सचदेवचे हे दुसरे लग्न तर संजय कपूरचे हे तिसरे लग्न आहे.
संजय कपूरची पहिली पत्नी डिझायनर नंदिता मथानी होती. नंदितापासून संजय कपूरला दोन मुले आहे तर करिश्मापासून दोन मुले आहेत. करिश्मा कपूरच्या मुलांची नावे समायरा आणि कियान असे आहे.