"माझ्या नवऱ्याने माझ्या सर्व मैत्रिणींसोबत शारीरिक संबंध..", अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:40 IST2025-06-24T16:40:28+5:302025-06-24T16:40:51+5:30

बॉलिवूडच्या अभिनेत्रीने तिच्या लाँग टर्म बॉयफ्रेंडसोबत लग्न केले. मात्र, काही काळानंतर ते विभक्त झाले.

''My husband had sex with all my friends..'', shocking revelation of the actress Mandana Karimi | "माझ्या नवऱ्याने माझ्या सर्व मैत्रिणींसोबत शारीरिक संबंध..", अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

"माझ्या नवऱ्याने माझ्या सर्व मैत्रिणींसोबत शारीरिक संबंध..", अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूडच्या अभिनेत्रीने तिच्या लाँग टर्म बॉयफ्रेंडसोबत लग्न केले. मात्र, काही काळानंतर ते विभक्त झाले. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मंदाना करिमी (Mandana Karimi) आहे. जिने अवघ्या २७ व्या वर्षी तिचा प्रियकर गौरव गुप्तासोबत लग्न केले. पण ६ महिन्यांत सर्व काही बदलले होते. मंदानाने २५ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रियकर गौरव गुप्तासोबत कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते. अलिकडेच एका शोमध्ये अभिनेत्रीने पतीबाबत धक्कादायक खुलासा केला होता. 

मंदानाने सांगितले होते की, तिचे लग्न फक्त २७ व्या वर्षी झाले होते. लग्नापूर्वी तिने गौरव गुप्ताला अडीच वर्षे डेट केले होते. डेटिंग केल्यानंतर त्यांनी सात महिन्यांनी लग्न केले. मंदानाने सांगितले होते की तिचा आणि गौरवचा २०२१ मध्येच घटस्फोट झाला. पण दोघेही बराच काळ वेगळे राहत होते. मंदानाने पुढे सांगितले की, लग्नानंतर तिचा नवरा तिच्या सर्व मैत्रिणींसोबत झोपायचा. एवढेच नाही तर तिचे सासरचे लोकही तिला खूप त्रास द्यायचे.


कंगना राणौतच्या 'लॉक अप' या शोमध्ये मंदाना करिमीने खुलासा केला होता की तिच्या नवऱ्याने तिच्या ओळखीच्या सर्व मैत्रिणींसोबत शारिरीक संबंध ठेवले आहेत. मंदानाने सांगितले की, जेव्हा ती गौरवपासून वेगळी होत होती तेव्हा तो असे वागायचा की जणू ती कधीच अस्तित्वात नव्हती. अभिनेत्रीने सांगितले की तिचे सासरचे लोक तिचा छळ करायचे. तिचे सासरचे लोक तिला मंदिरात पूजा करण्यास आणि सलवार-कमीज घालण्यास भाग पाडत असत. मंदानाने सांगितले की तिचे सासरचे लोक तिला अभिनय सोडण्यासाठी मागे लागले होते. तसेच लग्नासाठी तिला धर्मांतर करण्यास भाग पाडले गेले, असेही त्याने सांगितले.
 

Web Title: ''My husband had sex with all my friends..'', shocking revelation of the actress Mandana Karimi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.