ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे निधन, ७२ व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 04:23 PM2024-02-26T16:23:08+5:302024-02-26T16:24:13+5:30

पंकज उधास यांना २००६ मध्ये पद्मश्री हा मानाच सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Pankaj Udhas Passed Away)

Music legend and Padmashri winner Pankaj Udhas passes away at the age of 72 | ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे निधन, ७२ व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे निधन, ७२ व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास

Pankaj Udhas passed away: ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन झालं आहे.  पंकज यांनी ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंकज उधास हे एक भारतीय गझल आणि पार्श्वगायक होते. जे हिंदी चित्रपट आणि भारतीय संगीतविश्वातील त्यांच्या कामांसाठी ओळखले गेले. पंकज उधास गेले काही दिवसांपासून पॅनक्रिएटीक कॅन्सरशी (स्वादुपिंड) झुंज देत होते. त्यांच्या मुलीने पोस्ट करत दु:खद व्यक्त केलंय की, "अत्यंत जड अंत:करणाने, 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे दुःखद निधन झाल्याची माहिती देताना आम्हाला दुःख होत आहे." पंकज उधास यांच्या निधनाच्या बातमी येताच संगीतविश्वावर आणि भारतीय मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

१९८० मध्ये 'आहत' नावाच्या गझल अल्बमच्या रिलीजने त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर  १९८१ मध्ये मुकरार, १९८२ मध्ये तरन्नम, १९८३ मध्ये मेहफिल, १९८४ मध्ये रॉयल अल्बर्ट हॉल येथे पंकज उधास लाइव्ह, १९८४ मध्ये नयाब आणि १९८८ मध्ये फ्री असे अनेक हिट गाणे रेकॉर्ड केले. १९८६ मध्ये आलेल्या 'नाम' चित्रपटातील "चिठ्ठी आयी है" गाण्याने उधास यांना आणखी प्रसिद्धी मिळवून दिली. २००६ मध्ये त्यांना पद्मश्री हा  भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Web Title: Music legend and Padmashri winner Pankaj Udhas passes away at the age of 72

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.