Munnabhai MBBS : मुन्नाभाई मधला घाबरट 'स्वामी' आठवतोय का? अभिनेत्याला आता ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 12:00 PM2023-04-21T12:00:40+5:302023-04-21T12:03:18+5:30

चश्मा लावलेला, अतिशय बारीक, पण प्रचंड हुशार असलेला हा स्वामी तुम्हाला आठवत असेलच.

munnabhai mbbs actor khurshed lawyer played swami shocked everyone with latest photos | Munnabhai MBBS : मुन्नाभाई मधला घाबरट 'स्वामी' आठवतोय का? अभिनेत्याला आता ओळखणंही झालंय कठीण

Munnabhai MBBS : मुन्नाभाई मधला घाबरट 'स्वामी' आठवतोय का? अभिनेत्याला आता ओळखणंही झालंय कठीण

googlenewsNext

बॉलिवूडच्या सुपरहिट सिनेमांमध्ये एका सिनेमाचं नाव कायम घेतलं जातं ते म्हणजे 'मुन्नाभाई एमबीबीएस' (Munna Bhai MBBS) . अफलातून कथा, गाणी आणि अभिनयाने भरलेला कॉमेडी पण तितकाच इमोशनल असा हा चित्रपट होता. मुन्नाभाईचं पात्र साकारणारा संजय दत्त आणि सर्किटच्या भूमिकेतील अर्शद वारसीने सर्वांना खळखळून हसवलं. सिनेमातील इतरही पात्र अगदी लक्षात राहण्यासारखेच होते त्यातील एक म्हणजे स्वामी नावाचं पात्र.

चश्मा लावलेला, अतिशय बारीक, पण प्रचंड हुशार असलेला हा स्वामी तुम्हाला आठवत असेलच. परिक्षेत पास होण्यासाठी मुन्नाभाई त्याची मदत घेताना दाखवले आहे. यामध्ये तो अतिशय भित्रा असल्याचंही दाखवलं आहे. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे खुर्शीद लॉयर (Khurshed Lawyer).

अभिनेता खुर्शीदला आता ओळखणंही कठीण झालं आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खुर्शीदचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. हा फोटो बघून अनेक जण त्याला ओळखू शकले नाहीत. या फोटोत त्याचा कुल लुक बघायला मिळतोय. 

नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. 'स्वामीचा रोल खूपच मस्त होता','तुमचं हे काय झालंय' अशा कमेंट्स त्याच्या फोटोवर आल्या आहेत. 'द ग्रेट इंडियन मर्डर' या वेबसिरीजमधून खुर्शीदने कमबॅक केले आहे.

Web Title: munnabhai mbbs actor khurshed lawyer played swami shocked everyone with latest photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.