करीना कपूर आणि अनन्या पांडेच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस, कारणही कळालं! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 17:09 IST2022-06-10T17:09:19+5:302022-06-10T17:09:58+5:30

सोशल मीडियात आपण बऱ्याचदा बॉलीवूड सेलिब्रिटींच्या घराबाहेर त्यांचं चाहते किंवा माध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी पाहिली असेल.

mumbai police reached kareena kapoor khan and ananya pandey house know the reason | करीना कपूर आणि अनन्या पांडेच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस, कारणही कळालं! 

करीना कपूर आणि अनन्या पांडेच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस, कारणही कळालं! 

मुंबई

सोशल मीडियात आपण बऱ्याचदा बॉलीवूड सेलिब्रिटींच्या घराबाहेर त्यांचं चाहते किंवा माध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी पाहिली असेल. नुकतंच अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) यांच्या घराबाहेर मुंबई पोलिसांना पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. करीना कपूर खान आणि अनन्या पांडे यांच्या घरी पोलीस पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं. करीना आणि अनन्याच्या घरी पोलीस नेमकं कशासाठी आले होते याची माहिती आता समोर आली आहे. 

करीना आणि अनन्याला एका पोलिसांच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी पोहोचले होते अशी माहिती आता समोर आली आहे. viralbhayani नं याबाबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि कॅप्शनमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे. करीना आणि अनन्या पांडे यांना मुंबई पोलिसांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठीचं निमंत्रण देण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले होते अशी माहिती आता समोर आली आहे. 

करीना कपूर खान हिचा 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा येऊ घातला आहे. यासोबतच करीना आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही दिसणार आहे. दुसरीकडे अनन्या पांडे नुकतीच अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता सिद्धांत चतु्र्वैदीसोबत 'गहराइयां' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ती आता लवकरच विजय देवरकोंडासोबत 'लाइगर' सिनेमात दिसणार आहे. 

Web Title: mumbai police reached kareena kapoor khan and ananya pandey house know the reason