"ज्या दिवशी लेखकांना सलमानपेक्षा जास्त...", मुकेश खन्नांचा यावेळी भाईजानवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 16:16 IST2025-08-10T16:15:51+5:302025-08-10T16:16:30+5:30

'हे देवा, बॉलिवूडची कोण रक्षा करणार?, असं का म्हणाले मुकेश खन्ना वाचा

mukesh khanna says who will save bollywood point out when will anybody pay writers more than salman khan | "ज्या दिवशी लेखकांना सलमानपेक्षा जास्त...", मुकेश खन्नांचा यावेळी भाईजानवर निशाणा

"ज्या दिवशी लेखकांना सलमानपेक्षा जास्त...", मुकेश खन्नांचा यावेळी भाईजानवर निशाणा

'शक्तिमान' फेम अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) अनेक मुद्द्यांवर रोखठोक बोलतात. कधी कपिल शर्मा तक कधी रणवीर सिंहवरुन त्यांनी वाद घातला होता. तर  आता त्यांनी थेट सलमान खानवरच निशाणा साधला आहे. सलमान आगामी 'बॅटल ऑफ गलवान'च्या चित्रीकरणात व्यग्र आहे.  दरम्यान त्यांनी सलमानच्या मानधनावरुन आवाज उठवला आहे. नक्की झालं काय वाचा.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या एका इंटरव्ह्यूचा फोटो इन्स्टाग्राम पोस्टवर शेअर करत मुकेश खन्ना यांनी सिने इंडस्ट्रीत लेखकाला काय किंमत असते यावर चर्चा केली. यातच त्यांनी सलमान खानवर निशाणा साधला. ते म्हणाले, "ज्या दिवशी आपल्याकडे लेखकांना सन्मान मिळेल आणि त्यांनी सलमान खानपेक्षाही जास्त मानधन मिळेल त्या दिवशी बॉलिवूडमध्ये चांगले सिनेमे बनणं सुरु होईल. हे देवा बॉलिवूडची कोण रक्षा करणार?"


त्यांच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे. 'अगदी खरं बोललात सर','खूपच खोल गोष्ट बोललात आता ती कशी घ्यायची हे समोरच्यावर निर्भर आहे','अगदी खरंय लेखकांना जास्त मानधन मिळायलाच हवं तेव्हाच ते आणखी चांगल्या कथा लिहितील'.

याधीही मुकेश खन्ना यांनी सलमानविरोधात वक्तव्य केलं होतं. २०१६ साली दबंग सिनेमाला लक्ष्य करत ते म्हणालेले की, 'अॅक्शन सिनेमांऐवजी लहान मुलांसाठी सिनेमे आणा.' तर दुसरीकडे नुकतीच त्यांनी शाहरुख खानची बाजूही घेतली होती. शाहरुख खानला जवान साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याचा अनेकांनी विरोध केला होता. मात्र मुकेश खन्ना यांनी शाहरुखची प्रशंसा केली होती. 

Web Title: mukesh khanna says who will save bollywood point out when will anybody pay writers more than salman khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.