दोन पिढ्या एकत्र! शाहरुख आणि त्याच्या दोन मुलांच्या आवाजाने सजलेला 'मुफासा द लायन किंग'चा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 16:17 IST2024-08-12T16:15:02+5:302024-08-12T16:17:01+5:30

शाहरुख आणि त्याची दोन मुलं एकाच सिनेमात एका खास निमित्ताने एकत्र येणार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर बघाच (shah rukh khan, mufasa)

mufasa the lion king trailer starring shah rukh khan aryan khan abram khan | दोन पिढ्या एकत्र! शाहरुख आणि त्याच्या दोन मुलांच्या आवाजाने सजलेला 'मुफासा द लायन किंग'चा ट्रेलर

दोन पिढ्या एकत्र! शाहरुख आणि त्याच्या दोन मुलांच्या आवाजाने सजलेला 'मुफासा द लायन किंग'चा ट्रेलर

शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असते. शाहरुखला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. शाहरुखची पुढची पिढी म्हणजेच त्याची लेक सुहाना खान सुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रीय आहे. याशिवाय शाहरुखचा लेक आर्यन खानने सुद्धा एका जाहिरातीच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केलंय. शाहरुखची धाकटा मुलगा अबराम सुद्धा आता मनोरंजन विश्वात पदार्पण करतोय. शाहरुख-आर्यन आणि अबराम आगामी 'मुफासा द लायन किंग' सिनेमाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत.

'मुफासा द लायन किंग' दोन पिढ्या एकत्र

आगामी हॉलिवूडच्या 'मुफासा द लायन किंग' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये मुफासाचा लायन किंग होण्यापर्यंतचा प्रवास दिसून येतो. या ट्रेलरमध्ये मुफासाचा लेक सिंबासुद्धा दिसून येतो. 'द लायन किंग'च्या पहिल्या भागात शाहरुख खानने मुफासाला आवाज दिला होता. आता शाहरुख पुन्हा एकदा मुफासाच्या रुपात परतला आहे. त्याचा धाकटा लेक अबराम छोट्या मुफासाला आवाज देणार आहे. तर आर्यन सिंबाच्या रुपात पुन्हा आवाज देताना दिसणार आहे. अशाप्रकारे 'मुफासा द लायन किंग' सिनेमात किंग खानच्या दोन पिढ्या एकत्र येत आहेत.


 


या तारखेला रिलीज होणार 'मुफासा द लायन किंग'

वॉल्ट डिस्ने स्टूडिओज निर्मित 'मुफासा द लायन किंग' सिनेमात शाहरुख खानसोबत श्रेयस तळपदे टिमॉनच्या आवाजात तर संजय मिश्रा पुंबाच्या आवाजात दिसणार आहेत. हा सिनेमा २० डिसेंबर २०२४ ला रिलीज होणार आहे. २०१९ साली आलेल्या 'द लायन किंग' सिनेमाने प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळवलं. या सिनेमात शाहरुख - आर्यन या बापलेकाने आवाज दिला होता. आता 'मुफासा द लायन किंग' सिनेमानिमित्ताने शाहरख-आर्यन जोडीला अबरामची साथ मिळणार आहे.

Web Title: mufasa the lion king trailer starring shah rukh khan aryan khan abram khan