MS Dhoni Birthday : माहीचा बर्थडे सेलिब्रेट करायला मध्यरात्री घरी गेला सलमान खान, धोनीसाठी केली खास पोस्ट, म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 10:40 IST2024-07-07T10:40:16+5:302024-07-07T10:40:59+5:30

धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाईजान मध्यरात्री माहीच्या घरी पोहोचला होता. फोटो शेअर करत भाईजानने धोनीला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

ms dhoni birthday salman khan celebrated captain cool birthday shared special post | MS Dhoni Birthday : माहीचा बर्थडे सेलिब्रेट करायला मध्यरात्री घरी गेला सलमान खान, धोनीसाठी केली खास पोस्ट, म्हणतो...

MS Dhoni Birthday : माहीचा बर्थडे सेलिब्रेट करायला मध्यरात्री घरी गेला सलमान खान, धोनीसाठी केली खास पोस्ट, म्हणतो...

तळपत्या बॅटने क्रिकेटचं मैदान गाजवणारा, रणनीतीने विरुद्ध संघाशी दोन हात करणारा कॅप्टन कूल आणि सगळ्यांचा लाडका महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. धोनीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. प्रचंड मेहनत आणि मैदानावरील खेळीने त्याने क्रिकेटविश्वात त्याचं नाव धसधशीत उमटवलं आहे. केवळ मैदानावरील उत्कृष्ट कामगिरीनेच नाही तर धोनी त्याच्या कृतीने प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्यामुळेच चाहतेही त्याच्यावर मनापासून प्रेम करतात. धोनी आज त्याचा ४३वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत.

एवढंच काय तर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानही धोनीचा मोठा चाहता आहे. म्हणूनच धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाईजान मध्यरात्री माहीच्या घरी पोहोचला होता. केक कापत धोनीने वाढदिवस सेलिब्रेट केला. यावेळी सलमान खानही उपस्थित होता.

धोनीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ त्याची पत्नी साक्षी धोनीने सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्टन कूलच्या बर्थडे सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे. तर सलमानने धोनीसाठी खास पोस्ट केली आहे. 

सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन धोनीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. धोनीच्या बर्थडे सेलिब्रेशनमधील हा फोटो आहे. हा फोटो शेअर करत भाईजानने धोनीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. "हॅपी बर्थडे कॅप्टन साहेब", असं कॅप्शन सलमानने या पोस्टला दिलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: ms dhoni birthday salman khan celebrated captain cool birthday shared special post