‘हॉट’ मौनी रॉयचे ‘हॉट’ फोटो क्षणात झाले व्हायरल, एकदा पाहाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 13:18 IST2019-12-16T13:18:23+5:302019-12-16T13:18:56+5:30
सध्या मौनी तिच्या मित्रांसोबत गोव्यात आहे. अशात गोव्याच्या बीचवरचे तिचे हॉट फोटो व्हायरल झाले नसतील तर नवल.

‘हॉट’ मौनी रॉयचे ‘हॉट’ फोटो क्षणात झाले व्हायरल, एकदा पाहाच!
छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री करणारी मौनी रॉय तिच्या हॉट अदांसाठी ओळखली जाते. सध्या मौनी तिच्या मित्रांसोबत गोव्यात आहे. अशात गोव्याच्या बीचवरचे तिचे हॉट फोटो व्हायरल झाले नसतील तर नवल.
होय, मौनीने गोव्याच्या बीचवरचे हॉट फोटो शेअर केले आहेत. ब्लॅक ड्रेसमध्ये एकापेक्षा एक बोल्ड पोज देतानाचे तिचे हे फोटो वेड लावणारे आहेत, इतके नक्की.
मौनीने अगदी काही तासांपूर्वी हे फोटो शेअर केलेत आणि काहीच तासांत या फोटोंना 3 लाखांवर लाईक्स मिळालेत.
बेस्ट फ्रेंडसोबतचा एक फोटोही तिने शेअर केला. या फोटोतील मौनीने चाहत्यांना अक्षरश: घायाळ केले.
मौनी एक ट्रेंड कथ्थक डान्सर आहे. सुरूवात २००६ साली एकता कपूरची मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून करिअरची सुरुवात करणा-या मौनीने ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. नुकताच तिचा ‘मेड इन चायना’ हा सिनेमा रिलीज झाला. लवकरच ती रणबीर व आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झळकणार आहे.
‘देवो के देव- महादेव’ मालिकेत मौनीने सतीची भूमिका केली होती. या मालिकेने मौनीला वेगळी ओळख दिली. सतीच्या नावाने ती घराघरात प्रचलित झाली. पुढे बॉलिवूडकडे तिने मोर्चा वळवला. यासाठी अगदी लिप आणि जॉची सर्जरीही केली. अर्थात तिने ही गोष्ट कधीही स्वीकारली नाही.
पण तिचे आधीचे फोटो पाहून आपण अंदाज लावू शकतो. लूकमधील बदलामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. पण मौनीने कधीच या ट्रोलिंगची पर्वा केली नाही.