लॉकडाऊनमध्ये मौनी रॉयने शेअर केले नो-मेकअप लूकमधील हॉट फोटो, सोशल मीडियावर खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 11:23 IST2020-04-07T11:00:26+5:302020-04-07T11:23:12+5:30
तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

लॉकडाऊनमध्ये मौनी रॉयने शेअर केले नो-मेकअप लूकमधील हॉट फोटो, सोशल मीडियावर खळबळ
अभिनेत्री मौनी रॉय नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्व सेलिब्रेटींप्रमाणे अभिनेत्री मौनी रॉयदेखील क्वारंटाईनमध्ये आहे. पण तरीदेखील ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहे. त्यात आता तर ती तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
मौनीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे बिकनीमधील हॉट फोटो शेअर केले आहेत. या मौनीने खूपच हॉट आणि सेक्सी दिसते आहे. विशेष म्हणजे तिचे हे नो-मेकअप लूकमधील फोटो आहेत.. समुद्र किनाऱ्यावर मौनीने हे फोटो काढले आहेत. मौनीचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स आहेत.तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे
मौनी एक ट्रेंड कथ्थक डान्सर आहे. सुरूवात २००६ साली एकता कपूरची मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून करिअरची सुरुवात करणा-या मौनीने ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. राजकुमार रावसोबत ‘मेड इन चायना’ हा सिनेमात दिसली होती. लवकरच ती रणबीर व आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झळकणार आहे. यात ती नेगेटीव्ह भूमिका साकारणार आहे.