ही अभिनेत्री आहे मल्टीटास्कींग, पाहून तुम्हाला येईल याची प्रचिती, ओळखले का तुम्ही ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 14:33 IST2020-07-14T14:25:51+5:302020-07-14T14:33:11+5:30

योगाच्या सरावाने शरीरातील विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर कशी टाकली जातात याचा अनुभव जेंव्हा तुम्ही दररोज योगा करता तेव्हा येतो असे मौनी रॉय सांगते.

Mouni Roy choses Meditation & facial in her lockdown time | ही अभिनेत्री आहे मल्टीटास्कींग, पाहून तुम्हाला येईल याची प्रचिती, ओळखले का तुम्ही ?

ही अभिनेत्री आहे मल्टीटास्कींग, पाहून तुम्हाला येईल याची प्रचिती, ओळखले का तुम्ही ?

सुंदर आणि फीट दिसणं यासाठी मौनी रॉय खूप मेहनत घेते . ती दिवसाची सुरुवात योगा ने करते . स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नेहमीच वर्कआऊट करते.  तिचे योगाचे काही फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल झाले होते. अतिशय टॅलेंटेड अभिनेत्री  तिने स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे. 

मौनी चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी अशाप्रकारे  मेहनत घेते. अतिशय सौंदर्यवान अभिनेत्री सध्या तिच्या नृत्यकौशल्यावर प्रेक्षकांना स्वतःच्या प्रेमात पाडत आहे. नियमित योगा करण्याबद्दल मौनी सांगते,नुसते शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे.

रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा दैनंदिन सराव पुरेसा असतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नाहीशी करणारी प्रभावी तंत्रे आहेत.

योगाच्या सरावाने शरीरातील विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर कशी टाकली जातात याचा अनुभव जेंव्हा तुम्ही दररोज योगा करता तेव्हा येतो."
 

Web Title: Mouni Roy choses Meditation & facial in her lockdown time