मोनालिसाचं पहिलं गाणं 'सादगी' झालं रिलीज, दिसली खूपच सुंदर, चाहते म्हणाले - "याला म्हणतात नशीब"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 12:29 IST2025-06-14T12:29:16+5:302025-06-14T12:29:40+5:30

Monalisa : महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाचे पहिले गाणे 'सादगी' रिलीज झाले आहे, यामध्ये ती उत्कर्ष सिंगसोबत दिसत आहे आणि ती खूपच सुंदर दिसत आहे.

Monalisa's first song 'Saadgi' released, looks very beautiful, fans said - ''This is called luck'' | मोनालिसाचं पहिलं गाणं 'सादगी' झालं रिलीज, दिसली खूपच सुंदर, चाहते म्हणाले - "याला म्हणतात नशीब"

मोनालिसाचं पहिलं गाणं 'सादगी' झालं रिलीज, दिसली खूपच सुंदर, चाहते म्हणाले - "याला म्हणतात नशीब"

महाकुंभ २०२५च्या मेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा(Monalisa)चे नशीब एका रात्रीत चमकले. आता तिला पाहून तुम्हाला अंदाजही येणार नाही की ही तीच मोनालिसा आहे, जी एकेकाळी महाकुंभात माळा विकून आपला उदरनिर्वाह करत असे, आता ती लक्झरी जीवनशैली जगते आणि खूप सुंदर दिसू लागली आहे. अलिकडेच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती गायक उत्कर्षसोबत दिसत आहे. तिचे गाणे १४ जून रोजी रिलीज झाले आहे.

मोनालिसा आणि उत्कर्ष सिंगच्या नवीन गाण्याचा संपूर्ण व्हिडीओ युट्यूबवरील उत्कर्ष सिंग नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे आणि असे सांगण्यात आले आहे की हे गाणे १४ जून रोजी जगभरात रिलीज झाले आहे. या गाण्याच्या सुरुवातीला मोनालिसा एक सुंदर पांढरा फ्लोरल प्रिंट लेहेंग्यात दिसत आहे. याशिवाय, या व्हिडीओमध्ये मोनालिसा लाल लेहेंग्यात देखील खूप सुंदर दिसत आहे. उसकी आंखों से ही रोशन है सुबह का नूर, उसकी पलकों में ही ढलता है रात का गुरूर… असे या गाण्याचे बोल आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.


मोनालिसा आणि उत्कर्षच्या या गाण्याचा टीझर व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीही खूप छान दिसत आहे, याआधी मोनालिसाने या गाण्याशी संबंधित पडद्यामागील क्लिप देखील शेअर केली आहे. या गाण्यात मोनालिसाचे डोळे, सुंदर चेहऱ्याची निरागसता आणि नैसर्गिक सौंदर्य लोकांना आकर्षित करत आहे. मोनालिसा ही मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील महेश्वरची रहिवासी आहे आणि महाकुंभ मेळ्यात माळा विकण्यासाठी आली होती, तिचा सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ती रातोरात सोशल मीडिया सेन्सेशन बनली

Web Title: Monalisa's first song 'Saadgi' released, looks very beautiful, fans said - ''This is called luck''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.