"आमचं ६ महिन्यांचं प्रेम, पण...", मोनालिसाने फरमान खानला केलेलं प्रपोज, सुरुवातीला दिलेला नकार, लग्नानंतर खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:22 IST2026-03-12T12:22:23+5:302026-03-12T12:22:40+5:30
लग्नानंतर मोनालिसा आणि फरमान कॅमेरासमोर आले. लग्नासाठी मोनालिसानेच प्रपोज केल्याचा खुलासा यावेळी फरमानने केला.

"आमचं ६ महिन्यांचं प्रेम, पण...", मोनालिसाने फरमान खानला केलेलं प्रपोज, सुरुवातीला दिलेला नकार, लग्नानंतर खुलासा
महाकुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले हिने मुस्लिम बॉयफ्रेंड फरमान खानशी पळून जाऊन लग्न केलं आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. केरळमध्ये आधी कोर्ट मॅरेज आणि नंतर मंदिरात जाऊन हिंदू पद्धतीने त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर मोनालिसा आणि फरमान कॅमेरासमोर आले. लग्नासाठी मोनालिसानेच प्रपोज केल्याचा खुलासा यावेळी फरमानने केला.
फरमान म्हणाला, "आमचं सहा महिन्याचं प्रेम आहे पण ते ६० वर्षांइतकं आहे. मीदेखील एक अभिनेता आहे. एका सिनेमासाठी आमचं दोघांचं कास्टिंग झालं होतं. तेव्हाच आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो. त्यानंतर मग मोनालिसाने मला प्रपोज केलं होतं. मी सुरुवातीला नकार दिला होता. पण नंतर मोनालिसा म्हणाली की मला तू आवडतोस. त्यानंतर मग मीदेखील होकार दिला".
फरहान ख़ान की हुई मोनालिसा...
— Jeetu Besla (@JeetuBesla) March 11, 2026
महाकुंभ मेले में रुद्राक्ष माला बेचते समय अपनी नीली-भूरी आंखों की वजह से सोशल मीडिया पर वायरल हुई मोनालिसा एक बार फिर चर्चा में हैं।
आदिवासी समाज से आने वाली मोनालिसा के परिवार ने किया था शादी का किया था विरोध, जिसके बाद दोनों ने सुरक्षा के लिए केरल… pic.twitter.com/Z4u4HBZ6uk
आंतरधर्मीय विवाहाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने मोनालिसाने पळून जाऊन लग्न केलं असल्याचं सांगितलं आहे. मोनालिसा आणि फरमान केरळमध्ये फिरण्यासाठी आले होते. मात्र तिथेच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. खबरदारी म्हणून पोलिसांनी मोनालिसा आणि फरमान यांना सुरक्षा पुरवली आहे. पुढचे काही दिवस ते केरळमध्येच राहणार आहेत.