प्रियंका चोप्राच्या लग्नात आई मधु चोप्रा का होती नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 12:42 IST2019-01-31T12:42:08+5:302019-01-31T12:42:56+5:30

लग्नात प्रियंका व निकच्या चेह-यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. पण प्रियंका चोप्राची आई मधु चोप्रा मात्र पूर्णवेळ नाराज होती.

mom madhu chopra was upset with priyanka chopra during the wedding |  प्रियंका चोप्राच्या लग्नात आई मधु चोप्रा का होती नाराज?

 प्रियंका चोप्राच्या लग्नात आई मधु चोप्रा का होती नाराज?

गतवर्षी १ व २ डिसेंबरला प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी सहजीवनाच्या आणाभाका घेत लग्नगाठ बांधली. जोधपूरच्या उमेद भवन येथे तीन दिवस हा ग्रॅण्ड लग्नसोहळा पार पडला. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने प्रियंका व निक लग्नबंधनात अडकले. यानंतर  वेगवेगळ्या ठिकाणी तीन वेगवेगळे रिसेप्शन पार पडलीत. साहजिकच केवळ देशातचं नाही तर जगभर या लग्नाची चर्चा झाली. इतकी की अद्यापही या लग्नाची चर्चा थांबलेल्या नाहीत. या लग्नात प्रियंका व निकच्या चेह-यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. पण प्रियंका चोप्राची आई मधु चोप्रा मात्र नाराज होत्या. होय, लग्नाच्या इतक्या दिवसांनंतर खुद्द प्रियंकाने याचा खुलासा केला आहे. 


नुकतीच प्रियंकाने एलिन डिजेनरस हिच्या  लोकप्रीय चॅट शोवर हजेरी लावली. यावेळी तिने हा खुलासा केला. ‘ माझे लग्न एक ग्रण्ड इव्हेंट होता. लग्नाला केवळ २०० पाहुणे होते. ज्यात माझ्या व निकच्या कुटूंबातील सदस्यांचा समावेश होता. पण या लग्नात माझी आई पूर्णवेळ नाराज होती.  लग्नात मी सगळ्यांना बोलावले नाही, अशी तिची तक्रार होती.   अगदी माझा हेअर ड्रेसर, ज्वेलरी डिझाईनरला निमंत्रण का दिले नाही? हेच ती विचारत होती, असे प्रियंकाने सांगितले.


 मी एक खास पार्टी आयोजित करावी आणि त्यात जवळपास १५ हजार जवळच्या लोकांना बोलवावे, असाही तिचा आग्रह होता. मुलीच्या लग्नात प्रत्येकजण यावे, अशी तिची इच्छा होती आणि ही इच्छा पूर्ण न झाल्याने ती पूर्णवेळ नाराज होती, असेही प्रियंकाने सांगितले.  

Web Title: mom madhu chopra was upset with priyanka chopra during the wedding