'मोहब्बतें' फेम अभिनेत्री प्रिती झांगियानी आहे बॉलिवूडमधून गायब, घटस्फोटानंतर जगतेय असे जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 19:19 IST2021-06-16T19:19:11+5:302021-06-16T19:19:49+5:30

प्रिती भलेही आता चित्रपटात दिसत नसली तरी सोशल मीडियावरून चाहत्यांना तिची अपडेट देत असते.

'Mohabbatein' fame actress Preeti Zhangiani is missing from Bollywood, living a life after divorce | 'मोहब्बतें' फेम अभिनेत्री प्रिती झांगियानी आहे बॉलिवूडमधून गायब, घटस्फोटानंतर जगतेय असे जीवन

'मोहब्बतें' फेम अभिनेत्री प्रिती झांगियानी आहे बॉलिवूडमधून गायब, घटस्फोटानंतर जगतेय असे जीवन

मोहब्बतें चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्रिती झांगियानी तुम्हाला आठवतेय ना. चित्रपटात जिम्मी शेरगिल आणि त्यावेळी तरूणांना वेड लावणारी अभिनेत्री प्रिती आता बॉलिवूडमधून गायब आहे. प्रिती भलेही आता चित्रपटात दिसत नसली तरी सोशल मीडियावरून चाहत्यांना तिची अपडेट देत असते. 


प्रिती झांगियानीचे करिअर सिनेइंडस्ट्रीत फार यशस्वी ठरले नाही. प्रितीने निर्माता फिरोज नाडियादवालाचा भाऊ मुश्ताक खानसोबत लग्न केले. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि ते दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले.

त्यानंतर तिने स्वतःला कसेबसे यातून बाहेर काढले आणि काही कालावधीनंतर तिने दुसरे लग्न केले. २००८ साली प्रितीने अभिनेता परवीन डबाससोबत लग्न केले. लग्नानंतर ती दोन मुलांना जन्म दिला आणि ती संपूर्ण वेळ आपल्या कुटुंबाला देते आहे.

बॉलिवूडमध्ये चित्रपटापासून दूर राहिल्यानंतर प्रिती जाहिरात, शो आणि प्रादेशिक चित्रपटात दिसली. आता तिला बॉलिवूडमध्ये कमबॅक करायचे आहे. प्रिती झांगियानी आपल्या फिटनेसची खूप काळजी घेते आणि सोशल मीडियावर एक्सरसाइज करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते.


प्रिती झांगियानी ९०च्या दशकात अभिनेता अब्बाससोबत प्रसिद्ध म्युझिक व्हिडीओ छुई मुई सी तुममध्ये दिसली होती. याशिवाय तिने दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे.

तिने दाक्षिणात्य चित्रपटात आपली ओळख बनवल्यानंतर बॉलिवूडमध्ये पाउल टाकले होते. शाहरूख खानच्या मोहब्बतेंमधून तिने पदार्पण केले. तिच्यासोबत अपोझिट जिम्मी शेरगिल पहायला मिळाला होता.

Web Title: 'Mohabbatein' fame actress Preeti Zhangiani is missing from Bollywood, living a life after divorce