मिथीला पालकरचा हा लूक तुम्हाला करेल घायाळ, तिच्या अदांवर झालेत फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 06:30 IST2019-11-05T06:30:00+5:302019-11-05T06:30:00+5:30

‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल.

Mithila Palkar Hot Photo Viral On Social Media | मिथीला पालकरचा हा लूक तुम्हाला करेल घायाळ, तिच्या अदांवर झालेत फिदा

मिथीला पालकरचा हा लूक तुम्हाला करेल घायाळ, तिच्या अदांवर झालेत फिदा

सिने इंडस्ट्रीत एक उत्तम अभिनेत्री असल्याचे सिद्ध करणारी मिथीला आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे  सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे. अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

काही दिवसांपूर्वीच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मिथिलाहा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे.


तसेच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे मिथीलाचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

मिथीला कप साँगमुळे अल्पवधीतच साऱ्यांची लाडकी बनली होती. तिने वेबविश्वात अक्षरक्षा धुमाकूळ घातला होता. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल.
 

Web Title: Mithila Palkar Hot Photo Viral On Social Media