शाहरूख खानला मागावी लागली मिताली राजची माफी, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 16:01 IST2017-08-24T10:31:39+5:302017-08-24T16:01:39+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानने अभिनयाच्या जोरावर त्याच्या चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अशात त्याच्यावर कोणी रूसून बसेल असा ...

Mithali Raj apologizes to Shah Rukh Khan, but why? | शाहरूख खानला मागावी लागली मिताली राजची माफी, पण का?

शाहरूख खानला मागावी लागली मिताली राजची माफी, पण का?

लिवूडचा किंग शाहरूख खानने अभिनयाच्या जोरावर त्याच्या चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अशात त्याच्यावर कोणी रूसून बसेल असा अंदाज बांधणेही चुकीचे म्हणावे लागेल. मात्र शाहरूख एक व्यक्ती नाराज झाल्याने शाहरूखला चक्क त्याची माफी मागावी लागली. त्याचे झाले असे की, सध्या शाहरूख त्याच्या आगामी ‘टेड टॉक्स इंडिया’ या शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर वापसी करीत आहे. सध्या शाहरूख या शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, इतर प्रोजेक्ट सांभाळून शोच्या शूटिंगला वेळ देताना त्याची दमछाक होत आहे. काही दिवसांपूर्वी त्याला शोचा एक एपिसोड निर्माता करण जोहर आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज यांच्याबरोबर शूट करायचा होता, परंतु शाहरूख सेटवर वेळेत पोहोचू शकला नाही. त्यामुळे करण आणि मितालीला बराच काळ ताटकळत बसावे लागले. अखेर शाहरूख आला त्याने दोघांचीही माफी मागितली. 

या एपिसोडमध्ये करण आणि मितालीशी शाहरूख संवाद साधणार आहे. परंतु शोमध्ये यासाठी मिताली आणि करणला शाहरूखची चांगलीच प्रतीक्षा करावी लागली. सेटवर शाहरूख तब्बल ३ ते ४ तासांनी उशिरा आल्याने या दोघांचा संताप झाला नसेल तरच नवल. मात्र जेव्हा शाहरूख सेटवर आला तेव्हा या दोघांनी काही बोलण्याअगोदर शाहरूखनेच त्यांची माफी मागितली. त्याचबरोबर तुम्हाला माझ्यामुळे तीन ते चार तास येथे प्रतीक्षा करावी लागल्याने मला दु:ख होत असल्याचेही शाहरूखने अगोदरच स्पष्ट केले. 



पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, शाहरूखने मिताली राजची मनापासून माफी मागितली. तो मितालीला भेटला आणि तिला उशिरा येण्याचे त्याने कारण सांगितले. यावेळी शाहरूखने तिला सेटवर स्पीच देण्यासाठी मदतही केली. शाहरूखने मितालीला कम्फर्टेबल करण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले. त्याचबरोबर शाहरूखने हेही दाखवून दिले की, तो खºया अर्थाने जेंटलमॅन आहे. दरम्यान, शाहरूख सध्या आनंद एल राय यांच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात शाहरूख डबल रोल करणार आहे. 

Web Title: Mithali Raj apologizes to Shah Rukh Khan, but why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.