धरमपाजींकडून झाली गलती से मिस्टेक, तरीही फॅननी ट्रोल न करता म्हटलं Love u Sir
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 12:55 IST2018-05-21T07:25:32+5:302018-05-21T12:55:32+5:30
उत्साह आणि आनंदाच्या भरात अनेकदा आपण जे नाही करायचं ते करतो. आपण स्वतःच्या आनंदात इतके मग्न असतो की आपण ...
.jpg)
धरमपाजींकडून झाली गलती से मिस्टेक, तरीही फॅननी ट्रोल न करता म्हटलं Love u Sir
उ ्साह आणि आनंदाच्या भरात अनेकदा आपण जे नाही करायचं ते करतो. आपण स्वतःच्या आनंदात इतके मग्न असतो की आपण काय करतो आहे किंवा काय केले आहे याचे भानही आपल्याला नसतं. असंच काहीसं घडलं बॉलिवूडचे हिमॅन आणि ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांच्यासोबत.धर्मेंद्र यांचा लेक बॉबी देओल लवकरच बहुप्रतिक्षित 'रेस-३' या सिनेमात सलमान खानसह झळकणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. हा ट्रेलर पाहून आणि लेकाच्या कमबॅकमुळे धरमपाजी भलतेच एक्साईट झाले. त्यांच्या आनंदाला जणू काही पारावारच उरला नाही.आपला हाच आनंद त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांसह शेअर करायचं असं ठरवलं. त्यांनी इन्स्टाग्रामवर सिनेमाच्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या. मात्र शुभेच्छा देताना धरमपाजींनी 'रेस-३'च्या पोस्टरऐवजी स्वतःचा फोटो पोस्ट केला आणि सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. हीच कृती दुसऱ्या कलाकाराने केली असती तर सोशल मीडियावर त्या कलाकाराला रसिकांनी एव्हाना ट्रोल केले असते. मात्र धरमपाजींची बातच काही और आहे. आजही रसिकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि जिव्हाळा कायम आहे. त्यामुळे त्यांच्याकडून चुकून पोस्ट झालेल्या फोटोलाही रसिकांकडून प्रेम आणि दाद मिळाली.रसिकांनी त्यांची तोंडभरुन स्तुती केली. त्यांना हँडसम, उत्तम बॉडी अशी विशेषणं देत फॅन्सनी धरमपाजींवरील आपलं प्रेम व्यक्त केलं. 'रेस ३' हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच १५ जूनला रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दबंग सलमान खान, बॉबी देओल, अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडिस, डेजी शाह, शाकिब सलीम, फ्रेडी दारुवाला यांच्या प्रमुख भूमिका सिनेमाचं दिग्दर्शन रेमो डिसुजा यांनी केले असून रमेश तौरानी यांनी रेस-३ची निर्मिती केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सलमान आपला आगामी चित्रपट किक 2 मध्ये सुद्धा बॉबीला घेण्याचा प्लॉन बनवतो आहे.त्यामुळे 'किक 2'सुद्धा बॉबीचे एंट्री होण्याची शक्यता आहे. किकच्या पहिल्या भागात रणदीप हुड्डाने मुख्य भूमिका साकारली होती. एवढेच नाही तर साजिद नाडियाडवाल्याशी बोलून सलमानने बॉबीला 'हाऊसफुल्ल 4'मध्ये सुद्धा काम मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा सिलसिला इथवरचा थांबलेला नाही सल्लूमियां आपला आगामी चित्रपट 'भारत'मध्ये बॉबीला घेण्यासंदर्भात अली अब्बास जफरशी बोलतो आहे. यावरुन असे वाटते आहे की सलमानला बॉबीला सुपरस्टार बनण्याच्या विचारात आहे.