पत्नीसोबत मिलिंद सोमणच्या फोटोशूटने वेधले लक्ष, पाहायला मिळाला तरुणांना लाजवेल असा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 19:39 IST2021-03-19T19:32:25+5:302021-03-19T19:39:31+5:30

MilindSoman With Wife Ankita Konwar Photoshoot: मिलिंद सोमण ५५ वर्षाचा आहे तर अंकिता फक्त ३० वर्षाची आहे. अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे.

MilindSoman With Wife Ankita Konwar Raising The Temperature With Their Looks | पत्नीसोबत मिलिंद सोमणच्या फोटोशूटने वेधले लक्ष, पाहायला मिळाला तरुणांना लाजवेल असा उत्साह

पत्नीसोबत मिलिंद सोमणच्या फोटोशूटने वेधले लक्ष, पाहायला मिळाला तरुणांना लाजवेल असा उत्साह

 वयाच्या 55 व्या वर्षीही मिलिंद सोमणचा फिटनेस तरुणांना लाजवेल असा आहे. त्याच्या मॉडेलिंग आणि अभिनयापेक्षा तो फोटोशूट आणि फिटनेसमुळेच जास्त चर्चेत असतो. पुन्हा एकदा मिलिंदने पत्नी अंकितासोबत नवीन फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट पाहून चाहत्यांची मात्र बोलतीच बंद करुन टाकली आहे. काहींनी तर अंकिता पत्नीपेक्षी त्याची मुलगीच जास्त वाटते. तर काहींनी मिलिंद नेहमीच असेच फोटोशूट का करतो असे कमेंट्स केल्या आहेत. तर काहीजण त्यांच टर देखील उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुळात अंकिता आणि मिलिंद दोघेही अजब गजब कपल वाटतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा दोघे एकत्र येतात चाहतेही विचारात पडतात. हे कपल त्यांच्या केमिस्ट्रीपेक्षा वयात असलेल्या अंतरामुळेज जास्त चर्चेत असतात. कारण  मिलिंद सोमण ५५ वर्षाचा आहे तर अंकिता फक्त ३० वर्षाची आहे. अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे.

 

अंकिता आणि मिलिंदची पहिली भेट झाली होती ती चेन्नईच्या एका हॉटेलात. त्यावेळी अंकिता एअरहोस्टेस होती. या पहिल्या भेटीतच दोघांना एकमेकांबद्दल काही खास जाणवले. त्यावेळी अंकिताच्या बॉयफ्रेन्डचा मृत्यू झाला होता. बॉयफ्रेन्डच्या अकाली निधनाच्या धक्क्याने ती आतून कोलमडली होती. अशा स्थितीत मिलिंद तिच्या आयुष्यात आला.मिलिंदने अंकिताला आधार दिला आणि तिला भूतकाळ विसरासला मदत केली. मिलिंद हा अंकिताच्या आईपेक्षाही एका वर्षाने मोठा होता.

 

वयाच्या अंतरामुळेच अंकिताच्या आईवडिलांनी दोघांच्या लग्नाला नकार दिला होता. पण अंकिता ठाम होती. अखेर तिच्या जिद्दीपुढे आईवडिलांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला होता. मिलिंद आणि अंकिता यांचे एकमेकांवरचे प्रेम, एकमेकांबद्दलचा आग्रह हे सगळे पाहून अखेर अंकिताच्या कुटुंबाचा विरोध निवळला. दोघांच्याही कुटुंबाच्या संमतीने दोघांचेही थाटात लग्न पार पडले होते.2006 साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते.

 

अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे. सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेता व आर्यन मॅन मिलिंद सोमण आपल्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत येत असतो. याशिवाय तो त्याची पत्नी अंकीता कुंवरसोबतच्या फोटोंमुळेही ब-याचदा चर्चेत येत असतो. वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही मिलिंद सोमण आजही तितकाच तरूण दिसतो.

Web Title: MilindSoman With Wife Ankita Konwar Raising The Temperature With Their Looks