या अभिनेत्याला ‘पापाजी’ म्हणून हाक मारते त्याची पत्नी, वयात आहे 26 वर्षांचे अंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 12:20 IST2019-09-13T12:19:38+5:302019-09-13T12:20:21+5:30

90 च्या दशकात मॉडेलिंग आणि अ‍ॅक्टिंगमध्ये नशीब आजमावणारा हा अभिनेता सध्या ‘फ्री टू लव कॅम्पेन’मुळे चर्चेत आहे.

milind soman revealed his wife ankita konwar called him papaji sometimes | या अभिनेत्याला ‘पापाजी’ म्हणून हाक मारते त्याची पत्नी, वयात आहे 26 वर्षांचे अंतर

या अभिनेत्याला ‘पापाजी’ म्हणून हाक मारते त्याची पत्नी, वयात आहे 26 वर्षांचे अंतर

ठळक मुद्देमिलिंदने २००६ मध्ये फ्रेंच अभिनेत्री Mylene Jampanoi सोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही.

90 च्या दशकात मॉडेलिंग आणि अ‍ॅक्टिंगमध्ये नशीब आजमावणारा मिलिंद सोमण सध्या ‘फ्री टू लव कॅम्पेन’मुळे चर्चेत आहे. नुकताच मिलिंद व त्याची त्याच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान पत्नी अंकिता या कॅम्पेनचे ब्रँड अ‍ॅम्बिसीडर बनलेत. मिलिंद 53 वर्षांचा असून अंकिता 28 वर्षांची आहे. गतवर्षी दोघांनी लग्न केले. अर्थात वयाच्या अंतरावरून मिलिंद व अंकिता ट्रोलही झालेत. पण दोघांनीही याची कधीच पर्वा केली नाही. नुकतेच मिलिंद व अंकिता त्यांच्या रिलेशनशिपवर बोलले. यावेळी त्यांनी सोशल मीडियावरच्या ट्रोलर्सच्या कमेंट्सलाही उत्तरे दिलीत. यादरम्यानचा दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.


व्हिडीओत मिलिंद व अंकिता एकमेकांशेजारी बसलेले आहेत आणि  सोशल मीडियावरच्या कमेंट्स वाचत आहेत. मिलिंद एका युजरची कमेंट वाचतो. ‘अंकिता तू मिलिंदला पापाजी म्हणायला हवेस,’ अशी कमेंट्स मिलिंद वाचतो. ही कमेंट् वाचल्याबरोबर मिलिंद हसतो आणि अंकिता अनेकदा मला ‘पापाजी’ म्हणून हाक मारते, असा खुलासा करतो.

आपल्या व अंकिताच्या वयातील अंतरावरही तो बोलताना दिसतो. ‘आम्हा दोघांत वयाचा खूप मोठा फरक आहे. जवळपास 26 वर्षांचा.  माझ्या व माझ्या आईच्या वयात जितके अंतर आहे, तितकेच माझ्या व अंकिताच्या वयात आहे,’ असे तो म्हणतो.

समाजाने प्रेमावर काही बंधने लादली आहेत. धर्म, वंश, देश, लिंग, वयाचे अंतर अशा विविध कारणांवरून ही बंधने लादली गेली आहे. पण माझ्या मते, प्रेम करणे आणि आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असायला हवे, असेही तो म्हणतोय. अंकितानेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वय केवळ एक आकडा आहे. प्रत्येकाला आपल्या आवडीचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे, असे ती म्हणते.

मिलिंदने २००६ मध्ये फ्रेंच अभिनेत्री Mylene Jampanoi सोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. तीन वर्षाच्या संसारानंतर त्या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: milind soman revealed his wife ankita konwar called him papaji sometimes