मिलिंद सोमणने या वयात केले पहिल्यांदाच हे काम, पाहून पत्नी देखील झाली हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 06:27 PM2020-01-31T18:27:27+5:302020-01-31T18:30:02+5:30

मिलिंद या वयात नुकतीच एक नवीन गोष्ट शिकला आहे.

Milind Soman learnt driving at 54 | मिलिंद सोमणने या वयात केले पहिल्यांदाच हे काम, पाहून पत्नी देखील झाली हैराण

मिलिंद सोमणने या वयात केले पहिल्यांदाच हे काम, पाहून पत्नी देखील झाली हैराण

googlenewsNext
ठळक मुद्देमिलिंदने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले आहे की, मी एक नवीन गोष्ट शिकलो आहे. गाडी चालवायला अधिकाधिक लोक 18 व्या वर्षी शिकतात. मी हीच गोष्ट 54 व्या वर्षी शिकत आहे. काहीही नवीन शिकवण्यासाठी वयाचे बंधन नसते. 

५२ वर्षाचा मिलिंद २७ वर्षीय अंकिता. दोघांमध्ये २५ वर्षांचे अंतर असूनही या कपलमध्ये कमालीची केमिस्ट्री पाहायला मिळते. आम्हा दोघांसाठीही वय म्हणजे केवळ एक आकडा आहे, असे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मिलिंदने म्हटले होते. अजब गजब असणाऱ्या या कपलचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. तसेच फिटनेसबाबत नेहमी सतर्क असणारा मिलिंद सोमण बऱ्याचदा लोकांना फिटनेसचे टीप्स देत असतो. मिलिंदच्या प्रत्येक फोटोंना त्यांच्या चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत असल्याची पाहायला मिळते. त्याने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामला एक व्हिडिओ पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

मिलिंद आणि त्याच्या पत्नीची केमिस्ट्री खूपच छान असून त्याच्या चाहत्यांना ती आवडते. त्याने या वयात नुकतीच एक नवीन गोष्ट शिकली आहे. ही गोष्ट पाहून त्याची पत्नी देखील हैराण झाली आहे. मिलिंदला आजपर्यंत गाडी चालवायला येत नव्हती. पण आता तो गाडी चालवायला शिकला असून त्याने गाडी चालवत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून एक नवीन गोष्ट शिकायला मिळाल्याचा मिलिंदला किती आनंद झाला आहे हे आपल्याला दिसून येतेय. या व्हिडिओत आपल्याला अंकिता देखील दिसत असून ती म्हणत आहे की, आम्ही एका खूप चांगल्या ठिकाणी जात असून गाडी कोण चालवत आहे ते तुम्ही पाहा... 

मिलिंदने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले आहे की, मी एक नवीन गोष्ट शिकलो आहे. गाडी चालवायला अधिकाधिक लोक 18 व्या वर्षी शिकतात. मी हीच गोष्ट 54 व्या वर्षी शिकत आहे. काहीही नवीन शिकवण्यासाठी वयाचे बंधन नसते. 

मिलिंदचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना आवडत असून तुझ्याकडून आम्हाला नेहमीच काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळते असे ते कमेंटद्वारे सांगताना दिसत आहेत. 

Web Title: Milind Soman learnt driving at 54

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.